धुरंदर आणि राजकीय इच्छाशक्ती

13 Dec 2025 05:30:00
dhurandar आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या चित्रपटाने चांगली कमाई केलीच आहे, पण कमाईपेक्षाही याची चर्चा अधिक झाली आहे. प्रशंसकांनी स्तुतिसुमनांच्या माळाच्या माळाच निर्मिण्याचा ध्यास घेतला आहे आणि टीकाकारांनी दूषणे देण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या गलिच्छ शब्दांचा साठा मोकळा केला आहे. क्वचितच इतके यश एखाद्या चित्रपटाला लाभते. बऱ्याचदा चर्चा होऊनही चित्रपट चांगली कमाई करत नाही. तर कमाई करूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास अपयशी ठरतो. मात्र धुरंदरने या सगळ्या बेड्या मोडलेल्या आहेत. चित्रपट गुप्तहेरावर आधारित असला तरी त्याचा जॉनर हा स्पाय थ्रिलर नसून क्राईम थ्रिलर आहे. पाकिस्तानातील गँगवॉरचा संबंध गुप्तहेराशी लावण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे आणि तेथील गुंडांचा विक्षिप्त, विद्रूप, हिडिस आणि मानवतेला शाप ठरणारा चेहरा दाखवण्यातही त्याला यश लाभले आहे. 1999 रोजीचा आयसी-814 प्लेन हायजॅक, 2001 चा संसद हल्ला, 2008 मधील 26/11 हल्ला या तीन महत्त्वाच्या घटना चित्रपटांत येतात. 26/11 या प्रसंग तर थोडासा डॉम्युमेंटरी शैलीत घेण्याचा प्रयत्न झाला आहे.
 
 
धुरंधर
 
 
 
आदित्य धर हा ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि दिग्दर्शक म्हणून ‘धुरंदर’ हा त्याचा दुसरा चित्रपट. ‘बारामुल्ला’ या नुकत्याच गाजलेल्या चित्रपटाचा तो पटकथालेखक आणि निर्माताही आहे. त्यामुळे देशभक्ती हा त्याच्या एकंदर चित्रपटांचा सूर दिसतो. मात्र देशभक्ती दाखवताना तो उजवा किंवा डावा असा भेद करत नाही. धुरंदरच्या बाबतीत बोलायचं झालं तर आदित्य धरला जे अपेक्षित असेल ते असेल मात्र त्यातून राजकीय इच्छाशक्तीचा कमकुवतपणा सपशेल दिसतो. स्वयंघोषित बळजबरीचे पुरोगामी आणि नक्षली प्रवृत्तीच्या लोकांना ठसका लागून त्यांचा जीव बेहाल होतोय त्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे. डॉ. मनमोहन सिंग 2004 ते 2014 या काळात देशाचे पंतप्रधान होते. म्हणजे 26/11 हल्ल्यावेळी डॉ. मनमोहन सिंग तर प्लेन हायजॅक आणि संसद हल्ल्यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते. तरी सुद्धा चित्रपट पाहताना पुरोगाम्यांना इतका त्रास का झाला असावा? याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर पुरोगामी विश्व आपल्याला समजून घ्यावं लागेल.
पुरोगामित्वाची चळवळ भारतामध्ये ब्रिटिश काळात सुरू झाली. तरी त्याही आधीपासून भारतात वेगवेगळी मते अस्तित्वात होती. बुद्धकाळाच्या सुमारे 500 वर्षांपूर्वीही वेगळी मते मांडली जात होती. मात्र स्वातंत्र्यानंतर पुरोगामी चळवळीने विद्रूप रूप धारण केले. हिंदू विरोध हा या चळवळीचा केंद्रबिंदू झाला होता. त्यामुळे या चळवळीतील वैचारिक अधिष्ठान नाहीसे झाले. ही पुरोगामी चळवळ कशासाठी आहे याचा विसर पडून किंबहुना विसर पडावा याच हेतूने पुढे ही चळवळ सुरू राहिली. हिंदू विरोध करण्यासाठी त्यांना ब्राह्मण विरोध करणे क्रमप्राप्त होते. कारण विरोध, बंड हे बèयाचदा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असे होते. भारतातील प्रस्थापित म्हणजेच सवर्ण व ब्राह्मण या सवर्णांचे प्रतीक. हिंदू हा ब्राह्मणांचा धर्म आहे असे सांगून हिंदू धर्मावर तसेच हिंदुत्व या राजकीय सैद्धांतिक विचारावर घाला घालण्याचा प्रयत्न आजही होत आहे. सध्या या पुरोगाम्यांना हिंदू धर्म यापेक्षा हिंदुत्व हा अस्सल पुरोगामी विचारांनी नटलेला सिद्धांत अधिक धोकादायक वाटतो. कारण या विचारात असीम देशभक्तीची, देशासाठी वाट्टेल तो त्याग करण्याची, स्वतःच्या देहाची समिधा या देश-यज्ञात अर्पण करण्याची प्रेरणा आहे. हिंदुत्वाची व्याख्या अनेकांनी केलेली आहे. मात्र सावरकरांनी केलेली व्याख्या खूप गाजली. समर्थकच नव्हे तर विरोधकांनीही ही व्याख्या टीका म्हणून का होईना, पण डोक्यावर घेतली आणि पुरोगाम्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आधुनिक भारतातले सावरकर हे हिंदूंचे प्रमुख नेते असल्याचे मान्यही केले. म्हणूनच जिन्ना सुभाषबाबूंना हिंदूंचे नेते म्हणून सावरकरांची भेट घ्यायला सांगतात. आजही राहुल गांधी सावरकरांवर गलिच्छ आरोप करतात ते याच कारणासाठी. राहुल गांधी हे स्वत:ला या पुरोगामी विश्वाचा नेता मानतात आणि सावरकर हे त्यांचे प्रमुख विरोधक आहेत. आता या पुरोगामी विश्वाने केवळ हिंदू विरोध इतकेच ध्येय न ठेवता हिंदू विरोध करण्यासाठी देश विरोध हाही हेतू सर्वोच्च मानत आहेत. तुम्ही जर यांची विधाने, यांच्या कृती, यांची मते बारकाईने लक्षात घेतली तर तुम्हाला कळेल की या जयचंदाची औलादी आहेत. यांनी तर आता रँडला मारणाèया देशभक्त चापेकर बंधूंना व्हिलन ठरवण्याचा आणि रँडला हीरो ठरवण्याचाही बेत आखलेला आहे. हे स्लो पॉयजन ते कदाचित इंग्रजांचे हस्तकच असल्याने देत असावेत. हे जिहादी अतिरेकी व नक्षलींचे शुभचिंतक आहेत. भारतातले जे मूळ आहे, ते भारताचे शत्रू आहे, असा नॅरेटिव्ह हे लोक पसरवत आहेत. जेव्हा जेव्हा अतिरेकी हल्ला होतो तेव्हा हे भारतातल्या सरकारला दोष देतात (अर्थात असे हल्ले हे सरकारचे अपयश असतेच.) पण ज्यांनी हल्ला केला त्या जिहादी अतिरेक्यांविषयी यांच्या मनात प्रचंड आदर आणि प्रेमभाव असतो. पहलगाम हल्ला झाला तेव्हा अतिरेक्यांची बाजू मांडण्यासाठी हे पुरोगामी लोक जिवाच्या आकांताने धावत आले. ही पुरोगामी विचारधारा मूळच्या पुरोगामी या शब्दाला बाधक आहे. कारण मूळ पुरोगामी चळवळ या देशद्रोह्यांनी काबीज केली आहे. ही देशद्रोही मानसिकता अनेक काळापासून देशात अस्तित्वात आहे.dhurandar आपल्याकडे अनेक आक्रमक आलेत. त्या आक्रमकांना या देशद्रोह्यांनी मदत केली आहे. हिंदूंना किंवा मूलवासीयांना विरोध करण्यासाठी आणि त्यांच्यावर सत्ता मिळवण्यासाठी या लोकांनी परकीय शक्तींना आश्रय दिला. आजही टूलकिट गँगच्या माध्यमातून ही गोष्ट सहज सिद्ध करता येते. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात झालेल्या दंगलीला कोणी पाठिंबा दिला हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. प्रदूषणविरोधी आंदोलनात निर्दयी, खुनी माओवादी माडवी हिडमाचे गुणगान का? या प्रश्नाचे उत्तर फार कठीण नाही. रामाला विरोध आणि बाबरला समर्थन का? अफलझलखानाचे लांगूलचालन का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे काय?
धुरंदर या चित्रपटाला जो विरोध होतोय, त्याची ही पृष्ठभूमी आहे. लेखाची मर्यादा म्हणून मी फार विस्तृत स्वरूपात इथे मांडू शकत नाही. यासाठी मी वाचकांची क्षमा मागतो. मात्र आपल्याला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले असेल अशी आशा बाळगतो. मी वर म्हटल्याप्रमाणे धुरंदर भारतातील कोणत्याच जमातीवर लक्ष्य करत नाही. उलट तो पाकिस्तानचा गलिच्छ चेहरा उघड करतो. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना त्रास होतोय, हे आपण समजू शकतो. पण पुरोगाम्यांना का त्रास होतोय? याचं उत्तर म्हणजे उपरोक्त स्पष्टीकरण आहे. धुरंदरच्या निमित्ताने राजकीय इच्छाशक्ती काय असते हे आपल्याला कळतं. पाकिस्तानी गँगस्टर कशाप्रकारे बनावट भारतीय चलनी नोटांचा व्यापार करायचे हे कळतं आणि म्हणूनच नोटबंदी का आवश्यक होती हेही कळतं. ल्यारी या पाकमधील शहरातील गँग्स आणि उत्तर भारतातील गँग्स यांचा उल्लेख चित्रपटात येतो. तेव्हा स्वत:ला समाजवादी वगैरे म्हणवून घेणाèयांनी उत्तर प्रदेशची काय अवस्था केली असेल हे आपल्या लक्षात येते आणि आज या गँगस्टर्सवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवण्यात यूपी शासन यशस्वी झाले आहे हेही लक्षात येते. नक्षलींची कंबर मोडल्यामुळे शहरी नक्षलींचा झालेला मानसिक उद्रेकही आपल्याला समजतो. काश्मीर हा भारताचा भाग नाही असे उघडपणे बोलणारे काश्मिरी आणि आता दबक्या आवाजातही बोलण्यास घाबरणारे काश्मिरी यांतील भेद आपल्याला कळतो. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. इतक्या वर्षांत निर्माण केलेली घाण एक कांडी फिरवून जादूने स्वच्छ होणार नाही. कदाचित घाण निर्माण करण्यात जितकी वर्षे खर्च झाली, किमान तितकी वर्षे तरी घाण साफ करायला लागतील. पण घाण साफ झाली पाहिजे ही राजकीय इच्छाशक्ती तर हवीच ना? धुरंदर सुप्तपणे या राजकीय इच्छाशक्तीवर भाष्य करतो. पुरोगाम्यांना दुःख होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. कारण राजकीय इच्छाशक्ती म्हणजेच पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या या माफियांचा, गुंडांचा, राक्षसांचा, देशद्रोह्यांचा अंत!
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Powered By Sangraha 9.0