‘दिल्ली को दुल्हन बनाएंगे...गजवा-ए-हिंद करके रहेंगे’

13 Dec 2025 14:26:05
नवी दिल्ली,
 
 
hafiz-rauf-venom-against-india हाफिज सईदचा खास सहकारी आणि लष्कर-ए-तैयबाचा (LeT) दहशतवादी अब्दुल रौफने भारताच्या विरोधात गरळ ओकणारी वक्तव्ये केली आहेत. ‘काश्मीरचा लढा संपला, असे कोण म्हणते आहे? असे म्हणणाऱ्यांची तोंडे सडतील. काश्मीरचा लढा आता आणखी तीव्र होणार आहे,’ अशा शब्दांत त्याने भारताला धमकाविले आहे.
 
 
 
 
 
hafiz-rauf-venom-against-india
(मृत दहशतवाद्यांसाठी नमाज अदा करणारा दहशतवादी अब्दुल रौफ आणि मागे पाकचे लष्करी अधिकारी ) 
 
एवढ्यावरच न थांबता तो पुढे म्हणाला,‘अमीर मक्की साहेबांनी म्हटले होते की, आपण दिल्ली फत्ते करू. आपण दिल्लीला आपली ‘दुल्हन’ बनवू आणि हे होणारच आहे. आम्ही गजवा-ए-हिंद करणारच आहोत. सहा महिन्यांपूर्वी आम्ही भारताला हरविले आहे. आता आगामी 50 वर्षे भारत आमच्यावर हल्ला करण्याची हिंमत करणार नाही,’अशी मुक्ताफळे त्याने उधळली आहे.
 
 
 
‘राफेल (rafale), एस-400, ड्रोन...ही सगळी भारताची टेक्नॉलॉजी आमच्यासमोर काहीच नाही. आमच्या हवाई हद्दीमध्ये घुसण्याची भारतीय वायुसेनेची हिंमत नाही. जगभरातील 58 इस्लामिक राष्ट्रांपैकी फक्त आमच्याचकडे अस्सल अण्वस्त्रे आहेत,’ या त्याच्या विधानावरून त्यांच्या मानसिकतेतील विष उघड झाले आहे.
 
 
 
(operation sindoor) ऑपरेशन सिंदूर नंतर, अब्दुल रौफ हा एक निरागस आणि सज्जन पाकिस्तानी नागरिक असल्याचे पाकिस्तान लष्कराने म्हटले होते. आता त्याच निरागस पाकिस्तानी माणसाने भारताविरोधात गरळ ओकले आहे. रौफने ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या मेलेल्या दहशतवाद्यांसाठी मरकज-ए-तैयबाच्या मुरीदकेमध्ये नमाज अदा केली होती. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0