हाजी मस्तान यांच्या कन्येचा धक्कादायक आरोप

13 Dec 2025 11:14:23
मुंबई,
Haji Mastan daughter,  १९७० च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दबदबा निर्माण करणारा कुख्यात डॉन हाजी मस्तान यांची मुलगी हसीन मस्तान मिर्झा हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओमध्ये हसीन हिने स्वतःवर झालेल्या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटनांचा दावा करत थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे न्यायासाठी मदतीची याचना केली आहे.
 


Haji Mastan daughter, 
व्हिडीओमध्ये हसीन मिर्झा हिने सांगितले की, तिच्यावर बलात्कार झाला असून तिची हत्या करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याशिवाय तिची ओळख बदलण्याचा प्रयत्न झाला असल्याचाही गंभीर दावा तिने केला आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे, ती व्यक्ती आजपर्यंत एकदाही न्यायालयात हजर झालेली नाही, असे हसीनचे म्हणणे आहे. न्याय मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्याला प्रतीक्षा करावी लागत असून अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत तिने व्यक्त केली.
 
 
महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करताना हसीन मिर्झा म्हणाली की, देशात महिलांवरील गुन्ह्यांविरोधात अधिक कठोर कायदे करण्याची नितांत गरज आहे. आरोपी वर्षानुवर्षे कोर्टात हजर राहत नसताना पीडितेला मात्र न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, ही गंभीर बाब असल्याचे तिने सांगितले. कायदे कठोर असते, तर बलात्कार, हत्येचा प्रयत्न किंवा बळजबरीने मालमत्ता बळकावण्यासारख्या घटना रोखता आल्या असत्या, असे मतही तिने व्यक्त केले.
 
 
हसीन मिर्झा हिने Haji Mastan daughter,  माध्यमांकडेही मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण लढत असल्याचे सांगत, अनेकदा माध्यमांना साकडे घातले, मात्र आपल्या व्यथा कुणी ऐकल्या नाहीत, असा आरोप तिने केला. आता काही माध्यमांनी संपर्क साधल्यामुळे आपला आवाज देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल, अशी आशा तिने व्यक्त केली आहे. व्हिडीओच्या शेवटी हसीन हिने हात जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली.दरम्यान, हाजी मस्तान यांच्या वारशासाठी सुरू असलेल्या संघर्षाची पार्श्वभूमीही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हाजी मस्तान हे मुंबईतील सुरुवातीच्या डॉनपैकी एक म्हणून ओळखले जात होते. १९७० च्या दशकात अंडरवर्ल्डमध्ये त्यांच्या नावाची दहशत होती. पुढील काळात त्यांनी चित्रपट निर्मितीकडे वळण घेतले. त्यांच्या निधनानंतर, मुलगी हसीन मिर्झा हिने वडिलांच्या मालमत्ता आणि वारशासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढल्याचा दावा केला आहे. आपली खरी ओळख लपवण्यात आली आणि मालमत्ता बळकावण्यासाठी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही हसीनने यापूर्वी म्हटले होते.
हसीन मिर्झा हिने केलेले हे सर्व आरोप सध्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत असून, संबंधित यंत्रणांकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0