भारत विद्यालयात महिला शक्ती व संस्कारांचा संगम

13 Dec 2025 19:42:28
हिंगणघाट, 
hinganghat-news : स्थानिक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित भारत विद्यालय, विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनात सप्तशतीसंगम आणि मातृशतीसाठी एक दिवसीय शाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
lk
 
अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक किशोर चवरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाटच्या सदस्य सुवर्णा देशपांडे, विद्याभारती अंतर्गत सप्तशती संगम कार्यक्रमाच्या विदर्भ प्रांत संयोजक अर्चना जैनाबादकर, सहसंयोज स्वाती भोळे, विद्याभारती शिशु वाटिका प्रमुख निर्मला महाजन यांची उपस्थिती होती. तर प्रमुख वता म्हणून वैशाली खेतल, हेमलता चौधरी, सप्तशक्ती संगम कार्यक्रमाच्या संयोजक व पर्यवेक्षक निलाक्षी बुरीले, मनीषा कोंडावार, प्रधानाचार्य मनीषा देवगिरकर आदी उपस्थित होते.
 
 
मातृशक्तीशी हितगुज साधताना वैशाली खेतल यांनी भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत जेव्हा महिला शिक्षित आणि स्वावलंबी असतात तेव्हा संपूर्ण समाज प्रगती करतो. संयुत कुटुंब व्यवस्थेची परंपरा मजबूत करण्यात मातांच्या जबाबदारीवर आपले विचार मांडले आणि महिलांना कुटुंबाचा संतुलन स्तंभ म्हणून वर्णन केले. भारतीय व्यवस्थेच्या इतिहासाचा पाया अनेक स्त्रियांनी रचला, भारतीय संस्कृतीचा पाया म्हणून आदिशक्तीची उपासना प्राचीन काळापासून चालत आली आहे. स्त्री-शक्तीचे प्रतीक आहे. समृद्ध भारतासाठी या शतींना जागृत करू या व समाज परिवर्तनाचा संकल्प करू या असे आवाहन केले.
 
 
हेमलता चौधरी यांनी म्हणाल्या पर्यावरण संरक्षणात स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. चिपको आंदोलनात स्त्रियांनी झाडांना मिठी मारून जंगलतोड थांबवली आणि वैदिक काळापासून स्त्रिया निसर्गाशी जोडलेल्या आहेत, स्त्रिया केवळ गृहिणी नसून त्या निसर्गाच्या रक्षणासाठी मोठे योगदान देऊ शकतात. महिलांनी मुलावर पर्यावरण संस्कार करावे, त्यांच्या वाढदिवसाला एक रोपटे लावा व ते जगवा, पर्यावरण पूरक सण साजरे करा, पर्यावरण सर्व जीव जंतू, पशु पक्षी सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. कुटूंब हे सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
प्रस्ताविक निलाक्षी बुरीले यांनी यांनी केले. कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माता पालकांसाठी रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत जोत्सना धोटे, मनीषा भोयर, पाककला स्पर्धेत प्रियंका नागोसे, हर्षदा खोडके तसेच वेशभूषा स्पर्धेत शारदा बोभाटे, ममता येरचे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अपर्णा धारकर यांनी श्लोक तर अमृतवचन निकिता कामडी यांनी सादर केले. आभार पर्यवेक्षक मनीषा कोंडावार यांनी मानले. संचालन शुभांगी धात्रक यांनी केले.
Powered By Sangraha 9.0