बुटीबोरीत प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक उत्सव

13 Dec 2025 13:46:36
नागपूर,
Karmannai School of Excellence कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सिलेन्स, बुटीबोरी येथे प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. “वंडर ऑफ द वर्ल्ड” या थीमवर आधारित या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चेअरपर्सन प्रतिभा घाटे व डायरेक्टर प्रीती कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले.
 
Karmannai School of Excellence
 
शाळेचे प्रवेशद्वार एअरपोर्ट थीमवर सजविण्यात आले होते. वर्गखोल्यांमध्ये इजिप्त, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया आदी देशांची संस्कृती व वैशिष्ट्ये कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली होती. Karmannai School of Excellence मुलांसाठी आयोजित इंटरॲक्टिव्ह उपक्रम व सांस्कृतिक सादरीकरणांनी सर्वांचे मन जिंकले. हा कार्यक्रम शैक्षणिक, मनोरंजक आणि पालक-शाळा नातेसंबंध दृढ करणारा ठरला.
सौजन्य: उन्नती दातार, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0