गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न साकारले जात असल्याचे समाधान

13 Dec 2025 20:52:35
नागपूर,
Devendra Fadnavis : गत चाळीस वर्षांपासून नागपूरमधील प्रश्नांवर सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांमुळे आज आपण स्वमालकीच्या घरांपासून वंचित असलेल्या अनेकांना त्यांच्या नावाचे पट्टे बहाल करत आहोत. यासाठी पहिल्यांदा मी आमदार झालो, तेव्हा पट्टेवाटपाचा शासननिर्णय काढण्यात आपल्याला यश मिळाले. मुख्यमंत्री झाल्यावर याबाबत आपण धोरणात्मक निर्णय घेतला. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभाग, महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांनी परस्पर समन्वयातून जलद कार्यवाहीमुळे आज अनेकांनी आयुष्यभर जपलेल्या इच्छांची पूर्ती होऊ शकली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हा पॅटर्न आता राज्यभर लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
cm
 
 
 
प्रतापनगरातील शांतिनिकेतन कॉलनी पटांगणावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभास आमदार प्रवीण दटके, माजी आमदार नाना श्यामकुळे, कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर नंदा जिचकार, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदी उपस्थित होते.
 
भारतीय स्वातंत्र्याच्या काळात फाळणीमुळे आपले आहे ते सर्वस्व सोडून आलेल्या सिंधी बांधवांना अनेक महानगरांत रेफ्युजी कॉलनींमध्ये रहावे लागले. मागील काही वर्षांत अनेक आव्हाने त्यांनी आपला उदरनिर्वाह चालू ठेवला. इतकी वर्षे निर्वासीत म्हणून नावावर लागलेले बिरूद आता निघून सन्मानाने ते ज्या जागेवर रहात आहेत, त्या जागेची मालकी त्यांच्या नावावर झाली आहे.
 
प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गी लावला
 
मालकीहक्काचे पट्टे हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत हाताळून तो मार्गी यामुळे हजारो लोकांना त्यांच्या मालकीचे पट्टे मिळत आहेत, हे पाहून समाधान वाटते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर हे देशातील मोजक्या स्मार्ट शहरांपैकी एक शहर म्हणून गणले जात आहे. स्मार्ट शहरामध्ये ज्या सुविधा आवश्यक असतात, त्यात प्रामुख्याने क्रिडांगणे, सुविधायुक्त बाजारपेठा, उद्याने, भाजीमार्केट, परिवहन सुविधा याचबरोबर सक्षम पाणीपुरवठ्यासह व्यवस्थापन यावर भर असतो. या सर्व बाबी आपण नागपूर शहरामध्ये अंतर्भूत केल्या असून त्यातील अनेक कामे मार्गी लावली आहेत.
 
मालकीहक्काच्या पट्ट्यांचे दस्तऐवज प्रदान
 
 
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काच्या पट्ट्यांचे दस्तऐवज प्रदान करण्यात आले. याचबरोबर महापालिकेच्या सर्व सुविधांची माहिती उपलब्ध ‘एनएमसी स्मार्ट मित्र’ या ‘डिजिटल हेल्पडेस्क’ सुविधेचे लोकार्पणही यावेळी पार पडले.
Powered By Sangraha 9.0