नागपूर ,
Laxmi Nagar Nagpur आजही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जागी असल्याचा अनुभव नितिन खरबडे यांना आला. नागपूर विद्यापीठात कार्यरत . नितिन खरबडे यांचे पाकीट आज सकाळी राणी लक्ष्मी नगर परिसरात जाताना हरवले. हरवलेले पाकीट. सुरेश भांडे (अकाउंटंट, ॲड ग्राफिक्स) यांना आढळून आले. त्यांनी ते केवळ सुरक्षित ठेवले नाही, तर कार्यालयातील सहकाऱ्यांच्या मदतीने योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही निभावली.
काही वेळातच नितिन खरबडे यांना बोलावून त्यांचे पाकीट त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. Laxmi Nagar Nagpur हरवलेली वस्तू परत मिळाल्याचा आनंद आणि समोर प्रामाणिक माणूस उभा असल्याचे समाधान—हा क्षण भावूक करणारा ठरला. कृतज्ञतेने भरलेल्या शब्दांत खरबडे यांनी भांडे यांचे मनापासून आभार मानले.