बुलढाणा,
Leopard Sighting Buldhana, बुलढाणा नजीक सागवन परिसरात बिबट्या आढळून आल्याची घटना दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. बिबट्याच्या मुद्यावरून सध्या नागपूरात सुरु असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात बिबट्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात १० हजारावर बिबटे असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु यापेक्षा सुध्दा जास्त बिबटे असल्याची बाब विविध घटनांमधून समोर येत आहे.
बिबट्यांना जंगलात शिकारीसाठी प्राणी मिळत नसल्याने बिबटे नागरी वस्तीकडे धाव घेत आहे. बुलढाणा शहरालगत असलेल्या सागवन परिसरात दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याची घटना घडली आहे. सागवन येथील शेतकरी अशोक ग्यानबा जाधव यांच्या शेतात बिबट्या आढळला आहे. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्या आढळल्यामुळे सागवन परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी अशोक प्रल्हाद काळवाघे यांच्या शेताकडुन विजय मारवाडी यांच्या शेताकडे गेला आहे. बिबट्याच्या समवेत दोन बछडे आहेत तरी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.