बैठक झालीच नाही, आंदोलक आक्रमक!

13 Dec 2025 19:55:52
भंडारा,
bhandara-news : वारंवार आंदोलन करून केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. आज पुन्हा नागपुरात बैठकीचे परंतु बैठक झालीच नाही. बैठकीसाठी गेलेले शिष्टमंडळ रिकाम्या हाताने परत आल्याने संतापलेले आंदोलकांनी पुन्हा आंदोलन सुरु केले. रात्री उशीरा पर्यंत प्रशासन आणि आंदोलकांमध्ये संघर्ष सुरु होता. आंदोलक जल समाधी आंदोलनावर ठाम होते. काही तरुणांनी नदी पत्रात उड्या मारल्या. दरम्यान आंदोलकांना समजविण्यासाठी आलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी यापेक्षा जास्ती काही करू शकत नाही म्हणून आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला.
 
 
 
bhanadara
Powered By Sangraha 9.0