मोठी घोषणा ! महाराष्ट्रात लाखो कोटींच्या रस्ते कामांना गती

13 Dec 2025 14:18:31
नागपूर,
Nitin Gadkari केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्ते, पूल, एक्सप्रेसवे आणि इतर विकासकामांसाठी येत्या वर्षात १.५ लाख कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पांमध्ये ५० हजार कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहेत.
 

Nitin Gadkari 
गडकरी म्हणाले Nitin Gadkari  की, पुणे-छत्रपती संभाजीनगर मार्गावर १६,३१८ कोटींचा नवीन एक्सप्रेसवे बांधला जाणार आहे. यातील पहिला टप्पा पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर असा असेल. या मार्गाची दुरुस्ती आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी २ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुसरा मार्ग शिक्रापूर ते अहिल्यानगर बाहेरून बीड जिल्ह्यातून काढण्यात येईल, ज्यात फक्त टोलचे काम उरले आहे. या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर अडीच ते पावणे तीन तासांत पोहोचता येईल.
 
 
पुढील महत्वाच्या प्रकल्पांमध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड प्रकल्प असून, या प्रकल्पात खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असलेले चार स्तरांचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ४,२०७ कोटी असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच भूमिपूजन होणार आहे. तसेच हडपसर ते यवत या मार्गाचा एलिव्हेटेड प्रकल्प ५,२६२ कोटींचा असून याचा डीपीआर तयार आहे. कळंबोळी विकास प्रकल्पासाठी ७७० कोटींची मंजुरी देण्यात आली आहे.एमएसआयडीसीच्या माध्यमातून हे सर्व प्रकल्प राबवण्यात येणार असून, एनएचएआयला नाशिक फाटा ते खेड मार्गावर काही प्रकल्प देण्यात आले आहेत. या मार्गाचे भूसंपादन ९३ टक्के पूर्ण झाले असून, पहिला टप्पा नाशिक फाटा ते आळंदी फाटा (४,४०३ कोटी) आणि दुसरा टप्पा आळंदी फाटा ते खेड (३,३९८ कोटी) असा असेल.
 
 
 
 
पुणे-संभाजीनगर-नागपूर सुपर कनेक्टिव्हिटी
 
 
पुणे-मुंबई एक्सप्रेसवे तसेच Nitin Gadkari पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवेचा १३० किलोमीटरचा भाग, जो अटल ब्रीज ते पुणे-शिवार जंक्शनपर्यंत आहे, त्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई अंतर सुमारे दीड तासांत आणि पुणे-मुंबई-बेंगळुरू अंतर साडे पाच तासांत पार करता येईल.नितीन गडकरी यांनी याशिवाय नागपूर-काटोल सेक्शन, मराठवाड्यातील चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्ग आणि तळोदा ते शहादा, तळोदा ते यावल, तळोदा ते रावेरमार्ग यांसारखी विविध नवीन रस्त्यांची माहिती दिली. त्याचबरोबर सीआरएफ आणि अॅन्युअल प्लॅनमध्ये ६० हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळालेली असून, त्यातील २० हजार कोटींच्या कामांचा प्रगती पथावर आहे.गडकरी म्हणाले की, या सर्व कामांमुळे राज्यातील वाहतूक सुविधा सुधारतील, व्यापारी वाहतुकीला गती येईल आणि नागरी सुविधांमध्ये मोठा बदल होईल.
Powered By Sangraha 9.0