दाेन प्रेयसींना ‘राईड’ला नेण्यासाठी युवकाने चाेरल्या दाेन बाईक

13 Dec 2025 20:26:13
अनिल कांबळे
नागपूर, 
bike thief : स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना दाेन तरुणींवर युवकाचे प्रेम जडले. दाेघींही श्रीमंत घरातील असल्यामुळे त्यांना ‘इम्प्रेस’ करण्यासाठी युवकाने दाेन महागड्या बाईक चाेरल्या. त्या बाईकवरुन ताे दाेघींनीही िफरवत हाेता. मात्र, प्रेयसीला िफरवताना ताे पाेलिसांच्या जाळ्यात अडकला. पाेलिसांनी त्याला अटक करीत त्याच्या ताब्यातून चाेरीच्या दाेनही दुचाकी जप्त केल्या. निखिल याेगेश रंहागडाले (वय 22, अनमाेलनगर, गाेपाल किसन लाॅन जवळ, वाठाेडा) असे आराेपी युवकाचे नाव आहे.
 
संग्रहित फोटो
 
 
 
निखिल राहगडाले याने एका नामांकित महाविद्यालयातून बीसीएचे शिक्षण घेतले असून ताे जगनाडे चाैकात एका स्पर्धा परीक्षेसाठी क्लासमध्ये जाताे. त्याच्या मनात शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न हाेते. त्यामुळे ताे नियमित अभ्यासाकडे देत हाेता. मात्र, त्याच क्लासमधील एका श्रीमंत तरुणीशी त्याची मैत्री झाली. तिला महागड्या बाईकवरुन राईडसाठी त्याने विचारणा केली. तिने हाेकार दिल्यानंतर त्याने कामठी-नागपूर मार्गावरील भाटिया लाॅन येथे लग्न साेहळ्यासाठी एका युवकाने स्पाेर्ट बाईक आणली हाेती. ती संधी साधून निखिलने ती बाईक चाेरली. त्या बाईकवरुन ताे प्रेयसीला िफरायला नेत हाेता. यादरम्यान, त्याची आणखी एका तरुणीवर प्रेम जडले. तिच्यासाठी त्याने महालमधून अडीच लाख रुपये किंमत असलेली स्पाेर्ट बाईक चाेरली.
 
 
इंटरनेटवरुन घेतले प्रशिक्षण
 
 
दुचाकीचे लाॅक कसे ताेडावे आणि विना चावीने दुचाकी कशी सुरु करावी, याबाबत निखिलने यू-ट्यूब आणि इंस्टाच्या व्हिडियाेवरुन प्रशिक्षण घेतले. इंटरनेटवरील ज्ञानाचा वापर करुन ताे बाईक चाेरी करायला शिकला. त्याने नुकताच दाेन दुचाकी चाेरी केल्या. मात्र, प्रेयसीसाेबत िफरत असताना त्याला पाेलिसांनी पकडले. चाेरीची दुचाकी असल्याचे लक्षात येताच त्याला अटक केली.
 
 
50 सीसीटीव्ही फूटेजची मदत
 
 
आराेपी निखिल रहांगडाले याला अटक करण्यासाठी कामठी पाेलिसांनी 50 सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात निखिलची ओळख पटली. त्याला ताब्यात घेऊन पाेलिसांनी ‘प्रसाद’ दिला. त्यानंतर त्याच्या दाेन्ही प्रेयसींबाबत माहिती समाेर आली. त्या तरुणींना निखिलच्या प्रतापाची माहिती मिळाली. त्यामुळे दाेघींनीही ‘ब्रेक अप’ केल्याची माहिती समाेर आली.
Powered By Sangraha 9.0