पोलिस निरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी

13 Dec 2025 18:45:51
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Naresh Randhir येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांना शुक्रवारी एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांना तीन दिवसांची न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.नरेश रणधीर यांनी तक्रारदाराकडून 5 लाखांची लाच मागितल्याची तक्रार अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (अ‍ॅन्टी कॅरप्शन) करण्यात आली. या तक्रारीवरुन पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांच्यावर त्यांच्याच पोलिस ठाण्यात सावळा रचून रंगेहात पकडण्यात आले.
 

Naresh Randhir  
Powered By Sangraha 9.0