सिंचन प्रकल्पांवर निलेश राणे यांचा प्रशासनावर संताप

13 Dec 2025 14:05:04
नागपूर,
Nilesh Rane  कुडाळ-मालवण मतदारसंघातील अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या उशीर आणि कामाच्या निकृष्ट दर्जावरून आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. १९९६ साली सुरू झालेला आम्रड धरण प्रकल्प आज २०२५ मध्ये अजूनही अपूर्ण असल्याचे राणे यांनी संतप्त पणे सांगितले आणि प्रशासकीय जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केला.
 

Nilesh Rane 
आम्रड धरण प्रकल्पाची सुरुवातीची किंमत ४ कोटी ५ लाख रुपये होती, मात्र ३० वर्षांनंतर या प्रकल्पावर तब्बल ३४ कोटींचा खर्च झाला असून, प्रकल्प केवळ ८० टक्के पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा राणे यांनी दिशाभूल करणारा ठरवला. "३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पाच्या विलंबाला जीएसटी किंवा भूसंपादन यांसारखी कारणे सांगणे हास्यास्पद आहे," असे राणे म्हणाले.आमदारांनी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या खोटी माहितीवर संताप व्यक्त करत सांगितले की, "भूसंपादन २००५ मध्ये पूर्ण झाले असून त्यासाठी ७१ लाख रुपये दिले गेले. मग प्रकल्प विलंबित होण्याचे कारण भूसंपादन कसे ठरू शकते? तसेच, मंत्र्यांना अधिकाऱ्यांनी खोटी माहिती पुरवणे हे गंभीर प्रकार आहे."
 
 
राणे यांनी कुडाळ Nilesh Rane  तालुक्यातील वर्धा धरणाचे उदाहरण देत गंभीर इशारा दिला. "४ पैकी १ काम पूर्ण झालेले असल्याचे सांगितले जाते, पण वास्तवात वर्धा धरण मागील वर्षी फुटता-फुटता वाचले. निकृष्ट कामामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला," असे त्यांनी नमूद केले.मालवण भागातही स्थिती तीच असल्याचे राणे म्हणाले. प्रशासनाने दोन धरणे पूर्ण झाल्याची माहिती दिली होती, पण प्रत्यक्षात ३ पैकी एकही धरण पूर्ण झालेले नाही. "अधिकारी मंत्र्यांना खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करत आहेत, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारू?" असे राणे म्हणाले. सॉईल टेस्टिंगच्या नावाखाली फक्त वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.रखडलेले प्रकल्प आणि वाढलेला खर्च यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची मागणी करत आमदार निलेश राणे यांनी प्रशासनावर सखोल चौकशीचीही आवाहन केले. त्यांनी नमूद केले की, अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो आणि यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0