मला काही झालं तर राज्याचं नुकसान!

13 Dec 2025 11:15:07
नागपूर,
Prasad Lad received an electric shock हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत प्रश्नोत्तरीत समृद्धी महामार्गावरील ठाणे-भिवंडी बायपासवर प्रश्नोत्तरीत चर्चा सुरू असताना भाजप आमदार प्रसाद लाड बोलायला गेले असताना त्यांना माईकचा हलका शॉक लागला. यावेळी एका चित्रपटाची आठवण करून देत मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल असे प्रसाद लाड म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. तुमचा आम्ही पुतळा उभारू असेही संवाद यावेळी ऐकू आले.
 
 
Prasad Lad received an electric shock
 
भाजपा आमदार प्रसाद लाड हे आज विधान परिषदेत समृद्धी महामार्गाच्या मुद्यावरून बोलायला उभे राहिले. यावेळी माईकला हात लावल्यानंतर त्यांना वीजेचा धक्का जाणवला. सभागृहात माईकला हात लावताच वीजेचा धक्का लागण्याची ही दुसरी वेळ असल्याने हा माईक बदलवावा अशी विनंती त्यांनी सभापतींकडे केली. तसेच मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल, असे वक्तव्यही लाड यांनी केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर प्रसाद लाड यांच्या बाजूलाच बसलेल्या प्रवीण दरेकर यांनीही हजरजबाबी टिप्पणी करीत, तुम्हाला जर काही झालं, तर तुमचा पुतळा उभारू असा डायलॉग मारला. यावर विरोधक बाजू घेतात आणि मित्र असे म्हणतोय असे लाड यांनी म्हणताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.
 
 
तुम्ही सभागृहाचे लाड आहात - सभापती
मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल असे प्रसाद लाड यांनी म्हणताच त्याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आमचे नियोजन आहे. त्यामुळे अशी काहीही हानी होणार नाही, असे सभापती यावेळी म्हणाले. तसेच तुम्ही सभागृहाचे ‘लाड’ आहात. तुम्हाला चांगला ‘प्रसाद’ मिळाला अशीही कोपरखळी सभापतींनी मारताच हास्याची एकच लाट सभागृहात पसरली.
Powered By Sangraha 9.0