अनिल कांबळे
नागपूर,
protesters-police-altercation : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी बेराेजगार तरुणांनी शनिवारी लाेटांगण माेर्चाचा नारा दिला हाेता. मात्र, या आंदाेलनाला पाेलिसांनी परवानगी नाकारली. यशवंत स्टेडियमवर दुपारी एक वाजताच्या सुमारास जवळपास 5 ते 8 हजार युवक-युवती एकत्र जमले. त्यांंनी लाेटांगण घेत स्टेडियममधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी माेर्चेकèयांना बाहेर पडू दिले नाही. त्यामुळे पाेलिस आणि माेर्चेकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे एकच गाेंधळ उडून तणाव निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांना साैम्य बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे परिस्थिती चिघळली.

‘चाॅकलेट नकाे, राेजगार द्या’ अशी मागणी घेऊन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून आक्रमक पवित्रा घेत मैदानात उतरलेल्या बेराेजगार तरुणांनी शनिवारी देखील प्रचंड गदाराेळ केला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी बेराेजगार तरुणांनी यशवंत स्टेडियमवर ठिय्या मांडला. काेणत्याही परिस्थितीत लाेटांगण माेर्चा काढणारच या मागणीवर आंदाेलक मैदान साेडण्यास तयार नव्हते. त्यामुळे पाेलिसांनी बळाचा वापर करत मैदानातून बाहेर पडणारे सगळे मार्ग बंद केले. यशवंत स्टेडियमवरून बाहेर पडणाऱ्या मार्गांवर पाेलिसांनी चाेख बंदाेबस्त तैनात केला हाेता. दाेन्ही फाटक पाेलिसांनी बंद केल्यानंतर आंदाेलक आणि पाेलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. दरम्यान पाेलिसांनी कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नका, असे आवाहन केले. त्यामुळे आंदाेलनाचे नेतृत्व करणारे बालाजी पाटील चाकूरकर यांनी तरुणांना माघारी फिरण्यास सांगितले. मात्र, माेर्चा बाहेर पडू न दिल्यास आक्रमतेचा इशाराही त्यांनी पाेलिसांना दिला.
पाेलिसांचे अपयश ?
पाेलिसांचे बंदाेबस्ताचे नियाेजन अपयशी ठरल्याचे चित्र दिसत होते. माेर्चा काढण्यास परवानगी नसताना हजाराे युवक-युवती एकाच ठिकाणी जमल्यानंतर पाेलिसांना परिस्थिती याेग्यपणे हाताळता आली नाही. माेर्चेकरी आक्रमक झाल्यानंतर वरिष्ठ पाेलिस अधिकारीसुद्धा गाेंधळात पडले. शेवटी सीताबर्डीचे ठाणेदार विठ्ठलसिंह राजपूत यांनी आक्रमक झालेल्या माेर्चेकऱ्यांची समजूत घातली. या माेर्चामुळे यशवंत स्टेडियममध्ये दिवसभर तणावाचे वातावरण हाेते.