सरस्वती विद्यालयात दोन दिवसीय क्रीडा उत्सव

13 Dec 2025 12:26:00
नागपूर,
Saraswati Vidyalaya Nagpur -शंकर नगर येथील सरस्वती विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध हाऊस-स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.महोत्सवाचे उद्घाटन दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेचे (SIES) अध्यक्ष टी. के. व्यंकटेश यांच्या हस्ते झाले. यावेळी SIES चे अधिसभासद, शाळेच्या विविध विभागांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच क्रीडा महोत्सव संयोजक उपस्थित होते.

112 
 
 
पहिल्या दिवशी विविध ऍथलेटिक व मनोरंजक स्पर्धा पार पडल्या, तर दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून RTMNU क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालकडॉ. संभाजी भोसले उपस्थित होते. Saraswati Vidyalaya Nagpur धावणे, मैदानी व संघ स्पर्धांमुळे मैदानावर उत्साही वातावरण निर्माण झाले.क्रीडा विभाग प्रमुख रवींद्र कुलकर्णी यांनी वार्षिक क्रीडा अहवाल सादर केला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. यंदा ब्ल्यू हाऊस व ऑरेंज हाऊस यांनी समान गुण मिळवत संयुक्त विजेतेपद पटकावले.
सौजन्य : अनघा पेंडके,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0