परिचारिका संचालनालयासाठी धोरणात्मक अडचणी

13 Dec 2025 10:59:33
नागपूर, 
stewardship directorate परिचारिका हा राज्याच्या आरोग्यसेवेचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवून आवश्यक सेवा आणि सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र परिचारिका संचालनालय तयार करण्यासाठी शासन काय करीत आहे, असा प्रश्न विधान परिषदेच्या सदस्य उमा खापरे यांनी चर्चेदरम्यान विचारला असता या संचालनालयासाठी तीन विभागाच्या धोरणात्मक अडचणी असल्याची माहिती मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
 
 
 
parichrika
 
परिचारिकांचे स्वतंत्र संचालनालयासाठी शासनाकडे 13 डिसेंबर 2024 ला शासनाकडे केल्याचा मुद्दा खापरे यांनी उपस्थित करीत अद्याप त्यावर कुठलीही पावले का उचलली गेली नाही अशी विचारणा केली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी डॉक्टर नसल्यावर परिचारिकाच सेवा पुरवितात. त्यामुळे त्यांची सुरक्षा, रिक्त पदे याबाबत जलद अंमलबजावणीसाठी स्वतंत्र संचालनालय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्य विक्रम काळे यांनी देखील या मागणीसाठी मी सतत पाठपुरावा करीत असल्याचे सभागृहात सांगितले. यावेळी आबिटकर म्हणाले राज्यामध्ये 12 हजार 1 पदे नर्सिंग केडरचे आहेत. त्यांच्या सेवा, सुविधा, ट्रेनिंग, निवासाची व्यवस्था, प्रशिक्षण याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. 9 ऑक्टोबर 2017 रोजी केंद्र शासनाने नर्सिंग संचालनालयासाठी पत्र दिले. परंतु महाराष्ट्राचा विचार करताना राज्यातील आरोग्य सेवा ही सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व नगरविकास या 3 पद्धतीने विभागली गेली आहे.stewardship directorate या सर्वांना एकत्रित करताना काही धोरणात्मक अडचणी येत आहेत. त्यामुळे या तिन्हा विभागांची एकत्रित बैठक घेऊन संचालनालय जरी करता आले नाही, तरी नर्सिंग केडरमधील सर्व महिलांना अपेक्षित असलेल्या सुधारणा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आबिटकर उत्तरात म्हणाले.
Powered By Sangraha 9.0