कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी

13 Dec 2025 12:32:01
नागपूर,
Kavikulaguru Kalidas Sanskrit University कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेकला पहिले पेटंट मिळाले आहे. डॉ. दीपक कापडे, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक, यांना भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाकडून “समन्वित ग्रंथालय व्यवस्थापन प्रणालीवर आधारित निवडक माहिती प्रसारण” (Selective Dissemination Of Information Based Integrated Library Management System) या संशोधनासाठी पेटंट मिळाले आहे.
 
University
 
डॉ. कापडे यांनी संशोधक आणि अभ्यासकांसाठी जगभरातील माहितीचा साठा वापरून आवश्यक माहिती उपलब्ध करून देणारी प्रणाली विकसित केली आहे. Kavikulaguru Kalidas Sanskrit University त्यांनी विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयाचे डिजिटायझेशन करून आधुनिक सुविधांसह संपूर्ण कार्य ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य आणि कुलसचिव डॉ. रोशन अलोने यांनी डॉ. कापडे यांचे अभिनंदन केले आणि सर्व प्राध्यापक व संशोधकांना नवनवीन संशोधनासाठी प्रेरित केले.
सौजन्य: अनघा आंबेकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0