१२ तासांत तब्बल १,०५७ पुरुषांसोबत लैंगिक संबंध आणि...

13 Dec 2025 16:36:04
जकार्ता,
Tia Billinger deported to Indonesia १२ तासांत तब्बल १,०५७ पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा दावा करून जगभर चर्चेत आलेली वादग्रस्त ब्रिटिश प्रौढ सामग्री निर्माती बोनी ब्लू उर्फ टिया बिलिंगर हिला इंडोनेशियाने देशाबाहेर हद्दपार केले आहे. बाली येथून तिला हद्दपार करताना इंडोनेशियाने तिच्यावर किमान दहा वर्षांसाठी देशात प्रवेशबंदीही घातली आहे. २०२५ च्या सुरुवातीला आपल्या कथित “जागतिक विक्रमाच्या” दाव्यामुळे बोनी ब्लू चर्चेत आली होती. याआधीही तिच्या वादग्रस्त कृत्यांमुळे तिला ऑस्ट्रेलिया आणि फिजीमधून हद्दपार करण्यात आले होते. अलिकडेच बालीमध्ये ती एका निळ्या पिकअप ट्रकमधून फिरत प्रौढ सामग्रीचे चित्रीकरण करत असल्याचा आरोप तिच्यावर झाला. एका जबाबदार नागरिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका स्टुडिओवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान बोनी ब्लूसह इतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले, ज्यामध्ये दोन ब्रिटिश आणि एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा समावेश होता.
 
 
Tia Billinger deported to Indonesia
 
सुरुवातीला त्यांच्यावर इंडोनेशियाच्या कठोर पोर्नोग्राफी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा आर्थिक दंड होऊ शकतो. मात्र, तपासादरम्यान बोनी ब्लूविरुद्ध थेट पोर्नोग्राफीचा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. त्याऐवजी, तिने पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून काम केल्याचे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. परवान्याशिवाय वाहन चालवणे आणि वाहन नोंदणी न करणे हेही तिच्यावरचे आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने बोनी ब्लूवर किरकोळ दंड ठोठावला आणि तिला तात्काळ देशाबाहेर काढण्याचे आदेश दिले. इमिग्रेशन विभागाचे प्रमुख हेरू विनार्को यांनी स्पष्ट केले की, “ती सुट्टीसाठी आली होती, मात्र कंटेंट तयार करण्यासाठी तिने आपल्या व्हिसाचा गैरवापर केला.” कोर्टाबाहेर पडताना बोनी ब्लू कॅमेऱ्यासमोर हसताना आणि चुंबन उडवताना दिसली, ज्यामुळे तिच्या वादग्रस्त वर्तनाचीच पुन्हा चर्चा झाली.
याआधी ऑस्ट्रेलियामध्ये शाळेच्या सुट्ट्यांदरम्यान १८ वर्षांच्या मुलांसोबत प्रौढ कंटेंट तयार करण्याच्या कथित योजनेमुळे तिचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. फिजीमध्येही तिला “निषिद्ध स्थलांतरित” घोषित करून हद्दपार करण्यात आले होते. बोनी ब्लू आपल्या स्टंट्ससाठी ओळखली जाते. तरुणांना मोफत लैंगिक संबंधांची ऑफर देणे, त्याचे चित्रीकरण करणे आणि ते ऑनलाइन प्रसारित करणे, ही तिची पद्धत असल्याचे आरोप आहेत. ओन्लीफॅन्ससारख्या प्लॅटफॉर्मवरून ती मोठी कमाई करत असली, तरी अनेक देशांमध्ये तिचे काम अनैतिक आणि बेकायदेशीर मानले जाते. ही ताजी कारवाई बालीमध्ये परदेशी पर्यटकांच्या अनुचित आणि नियमबाह्य वर्तनाविरोधात इंडोनेशियाने घेतलेल्या कठोर भूमिकेचे प्रतीक मानली जात आहे. याआधीही नग्न फोटो किंवा आक्षेपार्ह सामग्री सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अनेक परदेशी प्रभावशाली व्यक्तींना इंडोनेशियातून हद्दपार करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0