जंगली श्वापदांचा बंदोबस्त करा, शेतकर्‍यांना कुंपण नि:शुल्क द्या

13 Dec 2025 19:33:59
हिंगणघाट, 
ajit-pawar : मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्हातील हिंगणघाट व समुद्रपूर तालुयात मोठ्या प्रमाणात वाघ, बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला असल्याने सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. शेतकर्‍यांनी शेतात जाणे सुद्धा बंद केलेले आहे. त्यामुळे वाघ, बिबट्या व जंगली श्वापदांचा बंदोबस्त करावा तसेच परीसरातील शेतकर्‍यांना सरकारने सौर ऊर्जेचे कुंपण नि:शुल्क उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी दिले.
 
 
ajit pawar
 
हिंगणघाट तालुयातील पोहणा, शेकापूर (बाई), वडनेर, कानगाव, अल्लीपूर, वाघोली, सावली (वाघ), बोपापूर, हिवरा, आजनसरा, फुकटा, पिंपरी, गांगापूर, भिवापूर, येरला, डोरला, वणी, जांगोणा, खापरी, धानोरा, कोल्ही, खेकडी, सेलू, सास्ती, हडस्ती, ढिवरी-पिपरी, बुरकोणी, लाडकी, चिंचोली, चिकमोह, पारडी, नांदगाव, बोरगाव, सातेफळ, कुंभी, काजळसरा, नरसाळा, सेलु मुरपाड, किनगाव, टेंभा, दोंदुडा, बांबर्डा तसेच समुद्रपुर तालुयातील कोरा, गिरड, नंदोरी, कांढळी, मांडगाव, जाम, खैरगाव, लसनपूर, सावरखेडा, कांढळी, साखरा, रासा, धामनगाव, सुकळी, वडगाव पाईकमारी, सायगव्हान, बोडखा, राळेगाव, खुर्सापार, वायगाव गोंड, परसोडी, धोंडगाव, भवानपुर, मंगरुळ, खंडाळा, जोगीनगुंफा, पिंपळगाव, ताडगाव या परीसरात वाघ व बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या सोबतीला रोही व रानडुक्कर यांनी सुद्धा हैदोस घालत शेतातील पिकं उद्धवस्त केली. या हिंस्त्र पशूंच्या भीतीमुळे शेतीची कामे तशीच पडलेली असुन शेतात जाण्यास शेतकरी प्रचंड धास्तावला आहे. ही समस्या लक्षात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागलीच वनविभागाचे मुख्य सचिवांना फोन करून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आदेश दिला. याप्रसंगी कामगार नेते आफताब खान, मेहेरबाबा पतसंस्था समुद्रपूरचे अध्यक्ष नरेंद्र थोरात, अंकीत ढगे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0