प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Sumit Wankhede मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या कारंजा (घा.)ची कीर्ती ‘केमिकल लो’च्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचली. विधानसभा अधिवेशनाचा मुहुर्त निघाल्याने त्या विषयाला अजूनच गंभीर घेतल्या गेले.
आ. सुमित वानखेडे यांनी पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले. या प्रकरणाचा तपास होईलच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असुन राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुला या कारंजात भेट देऊ शकतात, असे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले.कारंजा येथील अग्रवाल या युवकाने दोघांना सोबत घेत सीसी टिव्ही कॅमेरा दुरुस्तीच्या नावाखाली मेफेड्रान या मादक पदार्थाचा बाजार मांडला होता. यात १९२ कोटीचे मादक पदार्थ आणि कच्चामाल कोट्यवधीच्या घरात असल्याची चर्चा रंगात आली. या प्रकरणी नागपूर येथील डिआयआरच्या पथकाने नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातच हा गोरखधंदा उघड केला. त्यामुळे शासन आणि प्रशासन खडबडून जागे झाले, चौकशाही लागल्या. आयजी संदीप पाटील यांनीही तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधीक्षक अनुपकुमार जैन कारंजात तळ ठोकून आहेत. कारंजातीर पोलिस पाणीपाणी झाले आहेत. चौकशीच्या घेर्यात अडकण्याची भीतीही काहींना सतावत आहे. दरम्यान, डिआयआर पथकाने या तपासात प्रचंड गुप्तता पाळल्याने अनेक बाबी अजुन स्पष्ट झाल्या नाहीत. मात्र, पोलिस प्रशासनाचे या निमित्ताने चांगलेच वाभाडे निघत आहेत. आ. वानखेडे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी होईल असा विश्वास दिला. गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही चौकशी होणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, कारंजात दररोज एकापेक्षा एक वरिष्ठ अधिकारी पोहोचत आहेत. पोलिस महासंचालक रश्मी शुला या सुद्धा कारंजा येथे भेट देऊ शकतात, असे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, १५ रोजी Sumit Wankhede कारंजात होणार्या वाढदिवसाविषयी अफवेचे पेव फुटले आहेत. या वाढदिवसानिमित्त अडीच कोटी रुपये किंमत असलेली कारही त्याने बुक केली असल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय अग्रवाल याने पत्नीच्या सोन्याच्या बांगड्याही ३० हजार रुपयात मोडल्याचेही चर्चा आहे. याशिवाय वाढदिवसाला येणारी मंडळी सोने गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टमध्ये ‘तुल्यबळ पदार्थ’ दिल्या जाणार असल्याचीही चर्चा आहे.
खा. काळे यांची चुप्पी
नागपुरात राज्याचे तर दिल्लीत केंद्राचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. कारंजा ज्या मतदार संघात येते त्या आर्वी मतदार संघाचे आ. सुमित वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याच विधानसभा मतदार संघातील असलेले खा. अमर काळे हे सुद्धा दिल्लीतील अधिवेशनात आहेत. परंतु, राज्यात चर्चेचा विषय असलेला केमिकल लोच्यावर प्रश्न उपस्थित केला नाही हे उल्लेखनिय!