वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

14 Dec 2025 20:33:05
मूल, 
tiger-attack : गावाजवळील जंगलात गुरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना रविवार, 14 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पितांबर गुलाब सोयाम (37, रा. बेलगाटा) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
 
 
jk
 
मृतक सोयाम हे 13 डिसेंबरला दुपारी गुरे चारायला जंगलात गेले होते. मात्र सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाही. कुटुंबीयांनी गावात व परिसरात शोध मोहिम राबवली. परंतु, ते आढळले नाहीत. रात्री घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. दरम्यान, रविवारी सकाळी गावकरी व वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी जंगलात शोध मोहिम राबवली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे बेलगाटा परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी गुरे चारायला किंवा वन परिसरात जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केलेले आहे. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाने सानुग्रह मदत दिली. पुढील तपास वनविभाग करीत आहे.
Powered By Sangraha 9.0