हिंगणघाटात एकाच रात्री अर्धा डझन दुकानं फोडली

14 Dec 2025 20:43:43
हिंगणघाट,
hinganghat-shops-broken : आठवडी बाजारातील चार किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स, महाराष्ट्र आलू भंडार, अशी ६ दुकाने चोरट्याने फोडून पोलिसांना एक आव्हानच केले आहे. मागील चार महिन्यापासून याच परिसरात चोरीचे सत्र सुरूच आहे. ही घटना शनिवार १३ रोजी मध्यरात्री घडली.
 
 
hgt
 
आठवडी बाजारातील दशरथ ढोकपांडे यांचे शिवम किराणा स्टोअर्स, रुपेश गहलोद यांचे भावेश किराणा स्टोअर्स, फिरोज खान यांचे महाराष्ट्र आलू भंडार, प्रशांत टोटलवार यांचे मेहर किराणा स्टोअर्स, विनोद वैरागडे यांचे राज किराणा स्टोअर्स आणि गोल बाजारातील गोपाल जनरल स्टोअर्स या सर्व दुकानांचे लोखंडी रॉडने शटर वर करून दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात असलेली १० हजार रुपयांची चिल्लर चोरट्यांनी चोरून नेले आहे.
 
 
भावेश किराणा स्टोअर्स मधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये चोरटे स्पष्ट दिसत आहे. चोरटे २० ते २५ वयोगटातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सर्वच दुकानातील सीसी टीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता चोरटे आठवडी बाजारातील दुकाने फोडून गोपाल जनरल स्टोअर्स व कारंजा चौकाकडे गेले असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
 
 
आठवडी बाजारातील तीन महिन्यापूर्वी कापड दुकान, धान्य दुकाने फोडली होती. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Powered By Sangraha 9.0