धमर्शाळा,
Ind vs SA : भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सने पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ११७ धावांत गुंडाळले. त्यानंतर भारताने १५.५ षटकांत तीन बाद १२० धावा करून सामना जिंकला. भारताकडून अभिषेक शर्माने १८ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह सर्वाधिक ३५ धावा केल्या.