video 'स्टेजला किस्स' करून निघाला..चाहते झाले भावूक..आता जॉन सीना दिसणार नाही

14 Dec 2025 12:33:33
वॉशिंग्टन,

John Cena retirement, डब्ल्यूडब्ल्यूई रिंगचा एक सोनेरी अध्याय अखेर पूर्ण झाला आहे. १७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन जॉन सीना यांनी त्यांच्या २३ वर्षांच्या शानदार कारकिर्दीचा समारोप ‘शनिवार नाईट्स मेन इव्हेंट’मध्ये अत्यंत भावनिक आणि धक्कादायक पद्धतीने केला. त्यांच्या अंतिम सामन्यात सीना यांना रिंग जनरल गुंथर कडून पराभव पत्करावा लागला. हा सामना वॉशिंग्टन डी.सी. येथील कॅपिटल वन अरेनामध्ये खेळला गेला.
 
 

John Cena retirement, 
सामन्याच्या निर्णायक क्षणी गुंथरने सीना यांना ‘स्लीपर होल्ड’ मध्ये पकडले आणि त्यांना ‘टॅप आऊट’ (पराभव मान्य करणे) करावे लागले. गेल्या जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत सीना यांना ‘टॅप आऊट’ होण्याची ही पहिलीच वेळ होती. अरेनामधील चाहते काही क्षण स्तब्ध झाले आणि अनेकांनी डब्ल्यूडब्ल्यूईच्या या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली.पराभवानंतर, सीना यांनी रिंगमध्ये आपले प्रसिद्ध 'नेव्हर गिव्ह अप'चे ब्रीदवाक्य पूर्णत्वास नेले. संपूर्ण डब्ल्यूडब्ल्यूई लॉकर रूम तसेच कर्ट अँगल, मार्क हेन्री, आरव्हीडी यांसारख्या दिग्गजांनी रिंगबाहेर हजेरी लावून त्यांना निरोप दिला. सीएम पंक आणि कोडी ऱ्होड्स यांनी त्यांना चॅम्पियनशिप बेल्ट्स देऊन सन्मानित केले.भावनाविवश झालेल्या सीना यांनी आपले बूट आणि रिस्टबँड्स रिंगच्या मध्यभागी ठेवून डब्ल्यूडब्ल्यूई विश्वाला अखेरचा ‘सॅल्यूट’ केला आणि रिंगमधून बाहेर पडले. गुंथरने ‘लास्ट टाईम इज नाऊ’ टूर्नामेंट जिंकून सीना यांच्या अंतिम सामन्यासाठी आव्हान देण्याचा मान मिळवला होता. सीना यांच्या पराभवानंतर गुंथरचे महत्त्व आणखी वाढले आहे, तर सीना यांच्या रूपाने डब्ल्यूडब्ल्यूईमधील एक सोनेरी अध्याय संपला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0