मेट्रो भवनला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट

14 Dec 2025 19:59:08
नागपूर,
rajesh-agarwal : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मेट्रो भवनला शनिवारी भेट दिली. मुख्य सचिव पदाचा पदभार संभाळल्यावर राजेश अग्रवाल यांचा हा पहिलाच नागपूर मेट्रोचा दौरा होता. या दौर्‍यात त्यांनी नागपूर मेट्रो तर्फे योजनेंतर्गत राबवल्या जात असलेल्या क्रेझी कॅसल फुटाळा प्रकल्पाची पाहणी करीत एकूणच सद्यस्थिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी मेट्रो भवनला भेट देत मेट्रो भवन येथील ऑपरेशन कमांड सेन्टरची देखील माहिती घेतली.
 

metro-bhawan-agrwal 
 
 
 
यावेळी नागपूर मेट्रो संबंधी सादरीकरण करण्यात आले. यात मेट्रोच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्या संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरळीतपणे आणि अपेक्षित त्या गतीने असणार्‍या उपक्रमांची माहितीसह सादरीकरणात करण्यात आले. सादरीकरणानंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करीत रहाटे कॉलनी ते सीताबर्डी इंटरचेंज आणि सीताबर्डी इंटरचेंज ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन दरम्यान त्यांनी प्रवास केला. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, स्ट्रॅटेजिक प्लांनिंगचे अनिल कोकाटे, संचालक हरेंद्र पांडे, संचालक राजीव त्यागी आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0