श्रीराम मंदिरात गीता पारायण उत्साहात !

14 Dec 2025 12:47:42
नागपूर,
Shri Ram Mandir Ram Nagar भगवंत श्रीकृष्णांच्या कृपेने व परम श्रद्धेय गोविंदगिरीजी महाराजांच्या सूचनेनुसार गीता परिवारातर्फे नागपूर शहरात गीता पारायणाचे १०० कार्यक्रम घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
 
 
४ ४ ४
 
 
या उपक्रमातील एक भव्य गीता पारायण कार्यक्रम श्रीराम मंदिर, राम नगर येथे भक्तिभावात संपन्न झाला. कार्यक्रमात श्रीनिवास वर्णेकर यांनी समयोचित व प्रेरणादायी उद्बोधन केले. Shri Ram Mandir Ram Nagar गीता परिवाराच्या कविता देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यवाह राजीव काळेले यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला गीता परिवाराचे सदस्य तसेच अन्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:रवि वाघमारे ,संपर्क मित्र  

 
Powered By Sangraha 9.0