दुचाकीवर गोवंश मासाची तस्करी; आरोपीला केली अटक

14 Dec 2025 18:46:44
तभा वृत्तसेवा
पुसद,
smuggling-of-beef : शहर पोलिस ठाणेदार पथकासह गस्तीवर असताना एकजण दुचाकीवर गोवंश मासाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने लोहारलाईनमध्ये सापळा रचला. यावेळी गोवंशाच्या मासाची तस्करी करणाèयाला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली.
 

y14Dec-Atak 
 
या प्रकरणी, मोहंमद वसीम मोहंमद नूर कुरेशी (वय 33, लोहारलाईन) याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. शहर पोलिस ठाणेदारांच्या माहितीनुसार, लोहार लाईन येथे मोहंमद वसीम हा दुचाकी क्रमांक एमएच29 वाय8059 वर एका प्लॅस्टिकच्या पोत्यात गोवंश मासाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती.
पथकाने कारवाईत त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीची दुचाकी, 60 किलो वजनाचे 200 रुपये प्रतिकिला प्रमाणे 12 हजार रुपयांचे गोमांस असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
ही कारवाई शहर पोलिस ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक रमेश इंगळे, मनोज कदम, मंदाकिनी भगत, नीतेश भालेराव, आकाश बाभुळकर, दिनकर घुगे यांनी केली. या कारवाईने लोहारलाईन येथे गोमांसाची तस्करी करणाèयांचे धाबे दणाणले आहे.
Powered By Sangraha 9.0