कापूस केंद्रातून खरेदीचा श्रीगणेशा

14 Dec 2025 20:45:20
सिंदीरेल्वे,
cotton-center : स्थानिक बाजार समितीच्या मार्फत भारतीय कापूस निगम (सीसीआय)तर्फे यंदाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ शुक्रवारी झाला. मुहूर्तावर येथे ८ हजार ६० रुपये भाव देण्यात आला.
 
 
DSC_9607
 
ठरल्याप्रमाणे स्थानिक वासुदेव जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंगच्या आवारात सर्वप्रथम कापूस विक्रीसाठी आणणारे शेतकरी मोहन झिलपे यांचा शाल श्रीफळ देऊन बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कापसाला प्रतीक्विंटल ८०६० रुपये दर मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.
 
 
याप्रसंगी सीसीआय केंद्रप्रमुख चंद्रकांत हिवसे, खरेदी विक्री संस्थेचे माजी सभापती आशिष देवतळे, जिनिंग प्रेसिंगचे मालक जयराम पाटोदिया बंधू राधेश्याम पाटोदिया, बाजार समितीचे संचालक गोपाल कोपरकर, सचिव महेंद्र भांडारकर आदींसह शेतकर्‍यांची उपस्थिती होती.
 
 
कधीकाळी कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून विदर्भात नावलौकिक असलेल्या सिंदीच्या बाजारपेठेतील कापसाला फार महत्त्व आहे. मागील दशकात कापसाच्या एका बोंडाची पण या बाजार समितीच्या प्रांगणात खरेदी झाली नव्हती! यंदा खुल्या बाजारात कापसाला कमी भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी शासनाच्या कापूस खरेदीची अपेक्षा केली होती.
परिसरातील शेतकर्‍यांची सीसीआयमार्फत खरेदी सुरू झाल्याने सोय झाली.
Powered By Sangraha 9.0