इयत्ता बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याची मागणी

15 Dec 2025 16:51:46
नागपूर,
Marathi compulsory up to class 12 जिल्हा प्रतिनिधी प्रा. सुरेश नखाते आणि जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सपन नेहरोत्रा यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे व राज्यमंत्री ना. पंकज भोयर यांची भेट घेऊन मराठी विषयासंदर्भातील महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
 
nagpur
 
इयत्ता बारावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करावा, तसेच ११ वी–१२ वीमध्ये मराठी विषयाऐवजी माहिती तंत्रज्ञान (आयटी) हा विषय पर्याय म्हणून ठेवू नये, संचमान्यता प्रक्रियेत मराठी विषय शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उच्च माध्यमिक शिक्षकांना कर्तव्य रजा मंजूर करावी, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. Marathi compulsory up to class 12 अनुदानित उच्च माध्यमिक वर्गांमध्ये आयटीसारखे पर्यायी विषय दिल्यामुळे मराठी विषयाची विद्यार्थीसंख्या घटत असून शिक्षकांचे पद धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर्षीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळेही अनुदानित वर्गांवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. मराठी विषय शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत यासाठी तासिका व विद्यार्थीसंख्या निकषात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.
सौजन्य: सायली लाखे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0