केळझर,
kelzar-wardha-pankaj-bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, पंचायत, पायाभूत सुविधा, महिला-बालकल्याण आणि पर्यावरण आदी क्षेत्रांचा विकास होतो आहे. वर्षपुर्ती निमित्त पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केळझर येथील सिद्धी विनायकाची महाआरती आपल्या दुसर्या पर्वाची सुरूवात केली. यावेळी त्यांनी जनकल्याणासाठी सिद्धी विनायकाला साकडे घातले. kelzar-wardha-pankaj-bhoyar जिल्ह्यातील ८ शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परिसंस्थेचे प्रतीक बनल्या आहेत. इमारती, डिजिटल स्मार्ट स्कूल, सोलर पॅनल, ग्रंथालये, संगणक कक्ष, संगीत व क्रीडा साहित्य. या सर्व सुविधा एकत्रितपणे उभ्या राहिल्या. मल्टीमीडिया लॅब्सची उभारणी ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत पायरी आहे.
पालकमंत्री डॉ. भोयर सिद्धी विनायक चरणी!
kelzar-wardha-pankaj-bhoyar निरामय वर्धा अभियानाने जिल्ह्याला मोतिबिंदूविरहित करण्याचा प्रयत्न केला. अल्पावधीत ३२ हजारांहून अधिक तपासण्या आणि जवळपास १० हजार शस्त्रक्रिया झाल्या. सखी वन स्टॉप सेंटर, निरीक्षणगृहे, अंगणवाडींचे सक्षमीकरण (७५५ सक्षम, २०० स्मार्ट) आणि नवीन बांधकामे यातून महिला व बालकांसाठी सुरक्षा जाळे विस्तारले. वर्धा जिल्हा क्रीडा संकुल हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचे केंद्र बनत आहे. kelzar-wardha-pankaj-bhoyar ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, पॉलीमर ग्रास, बॅडमिंटन हॉल, शूटिंग रेंज, वसतिगृहे. तालुका क्रीडा संकुलांची उभारणी व अपग्रेडेशन युद्धपातळीवर सुरू असून सोलार लाईटिंग, ओपन जिम्स, प्रेक्षक गॅलरी उभी होत आहे. दहन-दफनभूमी विकास, ग्रापं भवन, अंतर्गत रस्ते, भूमिगत गटारे, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा या कामांनी ग्रामस्तरावर जीवनमान उंचावले.
kelzar-wardha-pankaj-bhoyar नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय, उड्डाणपुलांचे रुंदीकरण, सार्वजनिक इमारती. या प्रकल्पांनी सेवा-सुलभता वाढवली. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय आदिवासी भागांसाठी निर्णायक ठरत आहे. बोर-धाम सिंचन प्रकल्पांचे नुतनीकरण आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हे दीर्घकालीन जलसुरक्षेचे आधारस्तंभ ठरणार आहे. या प्रकल्पांमुळे शेती सिंचनाची सुविधा वाढणार असल्याने शेतकरी अन्य पिके घेऊ शकतील त्यामुळे शेतक-यांची आर्थिक सुबत्ता वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यत केला. kelzar-wardha-pankaj-bhoyar वर्धा जिल्हा राज्यातील ‘मॉडेल जिल्हा’ म्हणून उभा करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
kelzar-wardha-pankaj-bhoyar केळझर येथील भाजपा कार्यकर्ता महामेळावा व महाआरतीचे आयोजन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले होते. ना. डॉ. भोयर यांनी पत्नीक महाआरती केली. यावेळी आ. दादाराव केचे, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, मंदिराचे अध्यक्ष माधव ईरुटकर, विश्वस्त अनिल तेलरांधे आदींसह शेकडो भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.