ग्रामीण रुग्णालयासाठी सर्व पक्षांची एकजूट

15 Dec 2025 21:15:40
सिंदी (रे.), 
 
rural-hospital-wardha-sindi शहरात १९४८ पासून ‘क’ वर्ग नगरपरिषद असून १९९० पासून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहर आणि परिसराची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. परंतु, या आरोग्य केंद्रात केवळ प्राथमिक उपचारा शिवाय कोणतेही उपचार होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी येथील सर्व पक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
 
rural-hospital-wardha-sindi
 
 
rural-hospital-wardha-sindi रवीभवन, नागपूर येथे रविवारी सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री पंकज भोयर, आ. समीर कुणावर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ३५ वर्षापासून शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात दररोज २५० ते ३०० रुग्ण उपचाराकरिता येतात. परंतु, या केंद्रात सर्दी खोकला, ताप या शिवाय इतर कोणत्याही मोठ्या किंवा मध्यम आजाराचा उपचार होत नाही. साध्या सिजरची सोय नाही. एखादा अपघात झाला तरी सुद्धा ४०-५० किमी अंतरावर असणार्‍या वर्धा किंवा नागपूर येथे धाव घ्यावी लागते. त्या धावपळीत रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.
 
 
 
rural-hospital-wardha-sindi शहरात कोणतेही मोठे खासगी रुग्णालय नसल्याने कोणीही उपचाराअभावी जीव गमावू नये याकरिता शहरात शासनाचे ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. विहित मुदतीत ग्रामीण रुग्णालयाची घोषणा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ता अमोल सोनटक्के, पंकज झाडे, रोशना पेटकर, भाजपा शहर अध्यक्ष आजया साखळे, शरद पवार गटाचे गंगाधर कलोडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाशचंद्र डफ, उबाठा गटाचे शहर अध्यक्ष सचिन लांबट, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दिलीप बावणे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रशांत घंगारे आदी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0