चंद्रपूर,
street-dog-sterilization जिल्ह्यात मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली येथील विस कलमी सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक ठिकाणी कुंपण, निर्जंतुकीकरण व आश्रयस्थाने उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांना दिल्या.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा
street-dog-sterilization भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाने निर्धारित केलेल्या एसओपीनुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. यावेळी जिल्हाधिकार्यांनी शैक्षणिक संस्था, सार्वजनिक व खाजगी रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानके व डेपो, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे, बाल उद्याने, पर्यटन व मनोरंजन स्थळे आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी कुंपण, सीमा भिंत व प्रवेशद्वार उभारण्याच्या सूचना दिल्या. ही संरक्षक तटबंदी किमान 6 फूट उंचीची असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
street-dog-sterilization तसेच, संबंधित व्यवस्थापनांनी भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी व स्वच्छतेसाठी नोडल अधिकार्यांची नेमणूक करावी. परिसरातील कुत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण, लसीकरण व निर्बीजीकरण करून मनपा अथवा नगरपालिकांनी चालविलेल्या आश्रयस्थानी किंवा प्राणी कल्याण संस्था, गोशाळा, पांजरपोळ व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
street-dog-sterilization सार्वजनिक ठिकाणांवरून पकडलेल्या कुत्र्यांचे पशुवैद्यकीय अधिकार्यांमार्फत निर्जंतुकीकरण व लसीकरण करणे. आश्रयस्थानी ठेवण्यापूर्वी कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे, याची खातरजमा करणे व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेसाठी ‘ऑपरेशन थिएटर’ व साहित्य उपलब्ध करून देणे. विशेषतः 6 महिन्यांवरील नर कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करणे व 5 वर्षांपर्यंत दरवर्षी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे.
street-dog-sterilization भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुत्र्यांसाठी सुसज्ज आश्रयस्थाने उभारणे व त्याठिकाणी पाणी, खाद्य, स्वच्छता व देखरेखीची योग्य व्यवस्था ठेवणे. आक्रमक अथवा रेबीज बाधित कुत्र्यांना ज्या परिसरातून पकडले आहे त्या परिसरात पुन्हा सोडू नये. मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी महानगरपालिका व नगरपालिकांना कळविले आहे.