शोषणमुक्त समाज निर्मिती हेच ग्राहक पंचायतीचे ध्येय

15 Dec 2025 14:47:57
शेगाव,
exploitation-free society अखिल भारतीय ग्राहक पंचायत, विदर्भ प्रांताचा दोन दिवसीय अभ्यासवर्ग शेगाव येथे उत्साहात पार पडला. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन खामगाव जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे यांनी केले, तर अध्यस्थानी प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे होते. कार्यक्रमात पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री नितीन काकडे, तालुका संघचालक श्रीराम पुंडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर, अभिलेखाधिकारी रवींद्र भुसारी, प्रांत संघटक अभय खेडकर यांचा सहभाग होता. उद्घाटक बाळासाहेब काळे यांनी ग्राहकांना सजग करण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
 
shegao
 
प्रांताध्यक्ष डॉ. मेहरे यांनी ग्राहक पंचायतची सैद्धांतिक भूमिका स्पष्ट केली, तर रवींद्र भुसारी, विजय सागर, आनंदजी संगई, अविनाश प्रभुणे, डॉ. चारुदत्त चौधरी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. रात्री शेकोटीभोवती गटशः चर्चा प्रांत पदाधिकारी संजय आयलवार, ॲड. विनिता सावजी, ॲड. विभा देशमुख, दिनेश पांडे, वसंत वऱ्हाटे, प्रभाकर शिवणकर यांच्या उपस्थितीत रंगली. या अभ्यासवर्गात ग्राहकझेप नावाची मार्गदर्शक पुस्तिका देखील विमोचित करण्यात आली. exploitation-free society विदर्भातील अकराही जिल्ह्यातील ३० ते ८५ वयोगटातील शंभरहून अधिक प्रतिनिधींनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. आदर्श रिसॉर्ट येथे आयोजित या अभ्यासवर्गाचे आयोजन बुलढाणा शाखा अध्यक्ष सचिन कुलकर्णी, ॲड. विनय सावजी, प्रांत उपाध्यक्ष नगीनदास बैरागी आणि इतर कार्यकर्त्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0