विश्वमांगल्य सभा वाशीम शाखेची नवीन कार्यकारणी घोषित

15 Dec 2025 18:10:24
वाशीम,
Vishwamangalya Sabha,विश्वमांगल्य सभा हे संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा या चार स्तंभावर आधारित अखिल भारतीय स्तरावर अविरत कार्य करणारे मातृ संघटन आहे. घराघरातील माता देव, देश, धर्माचे चिंतन करणारी तसेच संस्कार, संस्कृती, परंपरा, कुलकुलाचार यांचे वहन करणारी आदर्श माता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने हे कार्य सुरु झाले.
 

Vishwamangalya Sabha, Washim Branch, 
रविवार, १४ डिसेंबर रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर, आययुडीपी येथे झालेल्या बैठीकीची सुरुवात शक्तीगायनाने झाली. प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनानंतर या बैठकीला उपस्थित विदर्भ प्रांत संघटक डॉ. पूजा चव्हाण यांनी सुरुवातीला विश्वमांगल्य सभेच्या कार्याचा विस्तार उपस्थित महिलांना सांगितला. त्यांनी वाशीम शाखेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. अर्चना मेहकरकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर वाशीम शाखेच्या संपूर्ण कार्यकारणीची घोषणा केली. यावेळेस सर्व कार्यकर्त्यांचा सभेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
वाशीम शाखेच्या उपाध्यक्ष म्हणून प्राचार्य स्नेहलता गवळी, सचिव अ‍ॅड. श्रुती गडेकर, सहसचिव अंजली पाठक, सह संयोजिका हेमा राठी, सदाचार सभा संयोजिका शुभा देव, सह संयोजिका गार्गी जोशी, संपर्क प्रमुख वृषाली टेकाळे, कार्यालय प्रमुख शर्मिला कोरान्ने, सहकार्यालय प्रमुख सुनीता हेडाऊ , कोष प्रमुख रूपाली देशमुख, प्रचार प्रसार प्रमुख नेहा काळे, बालसभा संयोजिका प्रा. ज्योत्स्ना पाटील, बाल सभा सहसंयोजिका सोनाली राऊत, ईश्वरी इरतकर, छात्रसभा संरक्षक प्रा. पाथरकर, संरक्षक अमिता भावसार, छात्रसभा संयोजिका गायत्री दळवी, छात्र सभा सह संयोजिका पल्लवी अवघन, भावना सरनाईक, संजना अवस्थी, धर्म संस्कृती शिक्षा विभाग संयोजिका मुग्धा पत्की, सहसंयोजिका तृप्ती ब्रह्मेकर, प्रशिक्षण प्रमुख जयश्री मुरलीधर, मंदिर संपर्क प्रमुख मेघा इंगळे, सोनल मिश्रा, स्वनाथ परिषद साठी लक्ष्मी इंगोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
विश्वमांगल्य सभेची नित्य कार्यपद्धती मासिक सदाचार सभा आहे. त्यामध्ये देखील भागाभागातील संयोजिके च्या नावांची घोषणा झाली. शुक्रवार पेठ मधील संगीता अवस्थी, आययुडीपी भागातील सुनीता राऊत, ज्योती आगे व अर्चना घुनागे यांच्या नावांची घोषणा झाली. त्याप्रमाणेच भागा-भागातील बाल सभा संयोजका यांच्याही नावांची घोषणा झाली. त्यामध्ये मन्ना सिंह चौकामधील पूजा चौधरी, आययुडीपी भागातील निशा गट्टानी, देव पेठ भागातील अनिता इंगोले यांचा समावेश आहे. यावेळी वाशीम जिल्हा विस्तारिका डॉ. अंजली कोडापे यांनी सर्व कार्यकारिणीला दायित्वश: जबादारी समजावून सांगितली, नित्य बैठकीचे महत्व समजावून सांगितले. जिल्हा सभा संयोजका वृषालीताई लक्रस व सर्व पदाधिकार्‍यांनी कार्यकारणीचे अभिनंदन केले. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक मनीषा जोशी यांनी केले. ही कार्यकारणी निर्माण करण्यामध्ये पूर्णकालिक प्रचारिका संगरा चुंबळकर यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0