आजनसरा-शेकापूर चौकात उड्डान पुलाची गरज

16 Dec 2025 19:15:48
आजनसरा, 
pankaj-bhoyar : वडनेर येथून नागपूर हैद्राबाद हा महामार्ग जातो. वडनेर येथील आजनसरा-शेकापूर चौकात उड्डान पूल नसल्याने ‘हाय वे ब्लॅक स्पॉट’ तयार झाला. अपघातात अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. भविष्या मोठा अपघात होण्यापूर्वी येथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पंसचे माजी सभापती व भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. पर्बत यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना दिले.
 
 
jk
 
 
निवेदनात नमुद केल्यानुसार, गेल्या वर्षी हिंगणघाट पंसचे माजी सभापती प्रभाकर बरडे याच चौकातून दुचाकीने रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या ठिकाणी अनेक मोठे अपघात होत असून महामार्गावरील धोकादायक स्थळ ठरत आहे. त्यामुळे हाय वे ब्लॅक स्पॉट घोषित करुन उड्डाण पुलाचे बांधकाम करण्याची मागणी डॉ. विजय पर्बत यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदनाद्वारे केली.
 
 
यावेळी माता मंदिर देवस्थानचे विश्वस्त गणपत गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोसूरकर यांची उपस्थिती होती. या राष्ट्रीय महामार्गाला ओलांडून यवतमाळ, राळेगाव, वरोरा, चंद्रपूरकडे राज्य मार्ग जातो तसेच अवघ्या १० किमी अंतरावर आजनसरा येथील पूरण पोळीच्या प्रसादासाठी विदर्भात प्रसिद्ध असलेले संत भोजाजी महाराजांचे तीर्थक्षेत्र आहे. येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना याच ब्लॅक स्पॉट असलेल्या आजनसरा-शेकापूर चौकातून जावे लागते. चौकात तातडीने उड्डाण पुलाची निर्मिती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0