चिमणीच्या आकाराचा थिरथिरा पक्षी

16 Dec 2025 16:25:54
थिरथिरा  
 black redstart
चिमणीच्या आकाराचा थिरथिऱ्याचं डोकं, छाती आणि पंख काळ्या रंगाचे असतात. शेपटीकडील भाग हा नारिंगी रंगाचा असतो. अस्थिर पक्ष्यांमध्ये याची गणना होते. तो सतत आपली शेपटी हलवत राहतो. शांत तर अजिबात बसत नाही. अंगाला सतत हेलकावे देत असतो. म्हणूनच त्याचे चित्त थाऱ्यावर नसते, असा हा थिरथिऱ्या पक्षी आपल्या डौलात मदमस्त विहार करतो.
 
 
 
 
thrthrya
 
 
हिवाळ्याच्या दिवसात थंडीचा कडाका वाढलेला असतो. अशावेळी, हिमालयातून थेट महाराष्टतील माळरानावर तसेच विरळ जंगलात एक पक्षी वास्तव्याला येत असतो. थिरथिन्ऱ्या असे त्याचं नाव। धिरधिऱ्या अर्थात ब्लॅक रेड स्टार्ट असे नाव असणारा हा पक्षी हिवाळ्याच्या थंडीत सर्वत्र विहार करताना दिसून येतो. चिमणीच्या आकाराचा धिरथिन्ऱ्याचं डोकं, छाती आणि पंख काळ्या रंगाचे असतात. शेपटीकडील भाग हा नारिंगी रंगाचा असतो. अस्थिर पक्ष्यांमध्ये याची गणना होते. तो सतत आपली शेपटी हलवत राहतो. शांत तर अजिबात बसत नाही. अंगाला सतत हेलकावे देत असतो. म्हणूनच त्याचे चित्त थाऱ्यावर नसते, असा हा धिरथिऱ्या पक्षी आपल्या डौलात मदमस्त विहार करतो. नर धिरथिऱ्या हा अधिक रंगतदार असून मादी ही नराप्रमाणेच आपले अंग आणि शेपटी सतत हलवते. तिचा रंग मात्र फिकट असतो, नर अधिक आकर्षक वाटतो. थिरथिऱ्या जमिनीवरील किडे-कोळी पकडत तोंडातून सतत ? 'विट्-विट्?' असा आवाज काढून स्वतःचेच मनोरंजन करीत असतो. जमिनीवरील किटकांवर ते हवेतल्या हवेत हल्ला चढवून गट्टम करतात. विणीच्या हंगामात नर धिरथिन्य पक्षी रक्षण करण्यात व्यस्त होतात. दुसऱ्या नराला तेथे येण्यास सक्त मनाई असते. हिवाळ्याच्या काळात विणीचा हंगाम संपलेला असतो. हा पक्षी थव्याने कधीच आढळत नाही. एकटे फिरण्यात यांना जास्त स्वारस्यअसतं. गवत, शेवाळ, लोकर आणि पिसांपासून ते आपले घरटे बनवतात. या पक्ष्याला कृष्ण धिरथिरा असेही म्हणतात. १५ सें.मी. आकाराचा हा पक्षी शेपटी हलविणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे काम करीत असतो. उन्हाळ्यात तो उत्तर भारतात हिमालयाच्या गढवाल भागापासून नेपाळपर्यंत कुठेही राहतो. कृष्ण थिरथिरा दगडी माळराने, बागा, जंगलाच्या बाहेरील हद्दीत जास्त आढळतो. मादी एकावेळी निळसर-हिरवट रंगाची चार ते सहा अंडी देते.
Powered By Sangraha 9.0