माधुरी हत्तीणी परत येणार! पुनर्वसन केंद्रासाठी मंजुरी मिळाली

16 Dec 2025 14:15:19
नांदणी,
elephant Madhuri will return माधुरी हत्तीणीच्या नांदणीत परत आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मठाच्या जागेत हत्तीच्या पुनर्वसन केंद्राचे बांधकाम करण्यास आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या असून उच्चस्तरीय समितीकडून माधुरीच्या आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला गेला आहे. या सुनावणीला नांदणी मठाचे माहुत आणि माधुरी हत्तीणी यांच्यातील विशेष नाते अधोरेखित करण्यात आले, अशी माहिती मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली.
 
 

madhuri elephant 
पुनर्वसन केंद्राच्या बांधकामास सात टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून अंदाजपत्रक १२ कोटी रूपये ठरवले गेले आहे. माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत सकारात्मक माहिती समोर आली असून मागील सुनावणीप्रमाणे नियुक्त केलेल्या समितीने समाधानकारक अहवाल सादर केला. एचपीसी आणि न्यायमूर्ती वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नांदणी मठ संस्थान वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त प्रस्तावानुसार पुनर्वसन केंद्राची बांधकाम पूर्वपरवानगी मंजूर करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे स्थलावर प्रत्यक्ष कामकाजाची गतिमत्ता निर्माण झाली आहे. सदर सुनावणीनंतर सर्व पक्षांनी समाधानी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, माधुरी हत्तीणीच्या पुनर्वसनासाठी पुढील कार्यवाहीसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे, असे वकील मनोज पाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0