मेसीच्या कार्यक्रमानंतर पश्चिम बंगालच्या क्रीडामंत्र्यांचा राजीनामा

16 Dec 2025 15:16:33
कोलकाता, 
west-bengals-sports-minister-resigned पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी राजीनामा दिला आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर टीकेला तोंड द्यावे लागत असल्याने, मंत्र्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राजीनामा पाठवला आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी मंत्र्यांचे पत्र सार्वजनिक केले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात बिस्वास यांनी म्हटले आहे की, या घटनेची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी ते राजीनामा देत आहेत.
 
west-bengals-sports-minister-resigned
 
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळ आणि तोडफोडीप्रकरणी डीजीपी राजीव कुमार, विधाननगरचे सीपी मुकेश कुमार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कार्यक्रमाच्या दिवशी कर्तव्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल डीसीपी अनिश सरकार (आयपीएस) यांच्यावर विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. west-bengals-sports-minister-resigned या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी पियुष पांडे, जावेद शमीम, सुप्रतिम सरकार आणि मुरलीधर यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0