आरोग्यसेविका करुणा सडमेक यांचा आरोग्यमंत्र्याच्या हस्ते विशेष सन्मान

16 Dec 2025 17:06:26
अहेरी, 
karuna-sadmek : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते अतिदुर्गम भागातील मुख्यालयी राहून उल्लेखनीय व उत्कृष्ट काम करणार्‍या हालेवारा येथील आरोग्यसेविका करुणा सडमेक यांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
 
 

AHERI 
 
 
नागपूर येथील एआयएमएसच्या ऑडिटोरियममध्ये 11 डिसेंबर रोजी आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
 
 
यावेळी या कार्यक्रमाला सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, पूणे येथील संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य विभागा नागपूरचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, राज्य क्षयरोग अधिकारी सांगळे तसेच विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0