लातूर,
latur-car-case लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका विचित्र आणि भयंकर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. वानवडा रस्त्यावर रात्री बाराच्या सुमारास एक कार जाळण्यात आली, ज्यात एका व्यक्तीला जिवंत अवस्थेत जाळले गेले. सुरुवातीला पोलिसांना वाटले की मृतदेह गणेश चव्हाण याचा आहे, परंतु तपासात धक्कादायक खुलासा झाला.
खरा मृतदेह गोविंद यादव नावाच्या निष्पाप व्यक्तीचा होता. गणेश चव्हाणने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव रचून मोठ्या प्रमाणावर टर्म इन्शुरन्स मिळवण्याचा कट रचला होता. त्यासाठी तो गोविंदला लिफ्ट देऊन नशेत असलेल्या गोविंदला ड्रायव्हिंग सीटवर बसवले, त्याच्यावर सीटबेल्ट लावली आणि नंतर कारला पेटवून दिली. या घटनेनंतर गणेश पसार झाला. तो तुळजापूर, कोल्हापूर मार्गे सिंधुदुर्गात लपला. latur-car-case सर्वजण गणेश मेला असल्याचे समजत होते. मात्र, गणेशने अपघातानंतरही आपल्या प्रेयसीसोबत फोनवर संपर्क साधला, आणि हा कॉल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे त्याचा कट उघड झाला. पोलिसांनी सिंधुदुर्ग परिसरात गणेशला ताब्यात घेतले. तपासात समोर आले की गणेशने कोटींच्या टर्म इन्शुरन्ससाठी निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला. सर्वजण त्याच्या मृत्यूला श्रद्धांजली वाहत असताना, हा भयंकर बनाव उघडकीस आला आणि संपूर्ण घटना धक्कादायक ठरली.