पुणे आयटी हबमध्ये बिबट्यांच्या हालचालींमुळे अलर्ट

16 Dec 2025 09:33:58
पुणे,
Leopards in Pune IT hub पुणे शहरात बिबट्या दिसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आयटी हबमध्ये सध्या भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे आयटी कंपन्यांमधील नेहमीची वर्दळ सुरू असताना, दुसरीकडे जंगली प्राण्यांच्या हालचालींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पुण्याच्या विविध भागांत अलीकडे बिबट्यांचे दर्शन झाल्यानंतर अव्वल आयटी कंपनी कॉग्निझंटने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा सल्लागार जारी केला आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की हिंजवडी परिसरात अद्याप बिबट्या आढळलेला नसला, तरी खबरदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
 
 

pune iit are leopard 
कंपनीने दिवस व रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अंधार पडल्यानंतर किंवा पहाटे एकटे बाहेर पडणे टाळावे, चालत जाण्याऐवजी कार्यालयीन वाहतूक, कारपूलिंग किंवा शेअर्ड कॅबचा वापर करावा, तसेच झुडुपे, जंगलसदृश किंवा निर्जन भागातून शॉर्टकटने जाणे टाळावे, असे सूचित करण्यात आले आहे. संध्याकाळी उशिरा किंवा रात्री फेज-२ कॅम्पसमध्ये विनाकारण प्रवेश करू नये, कोणत्याही संशयास्पद प्राण्यांची हालचाल दिसल्यास तात्काळ सुरक्षा पथकाला कळवावे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सर्व सूचनांचे पालन करावे, असेही कंपनीने नमूद केले आहे. विशेष म्हणजे, बिबट्या दिसल्यास घाबरू नये, शांत राहावे आणि पळू नये, कारण अचानक हालचालींमुळे प्राणी अधिक आक्रमक होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0