मुंडले स्कूलमध्ये ‘न्यूमेरोमॅजिक’ची रंगत

16 Dec 2025 19:25:16
नागपूर, 
mundale-school : दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, नागपूर संचालित मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंगळवार दिनांक १६ डिसेंबर रोजी आंतरशालेय ‘न्यूमेरोमॅजिक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नागपूर शहरातील ३७ नामांकित शाळांमधील एकूण १४८ विद्यार्थ्यांनी या अनोख्या स्पर्धेत सहभाग घेतला. गणित विषयाची गोडी निर्माण करणे आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणे, मधुर गाणी, सांस्कृतिक नृत्ये आणि लघुनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
 
 
mundle-school
 
 
 
कृष्णकुमार पांडे यांनी आपल्या भाषणातून शून्याचे महत्त्व विशद करत शून्याला ‘ब्रह्मांडनायक’ असे संबोधले. गणिताचे ज्ञान सर्वच क्षेत्रांत किती उपयुक्त आहे, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सतीश मोहगावकर यांचीही उपस्थिती लाभली. स्पर्धेच्या निकालात ज्युनियर गटात नारायण विद्यालय, वर्धा रोड यांनी प्रथम क्रमांक, सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर यांनी द्वितीय, तर सेंटर पॉइंट स्कूल, काटोल रोड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सीनियर गटात दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी रोड प्रथम, सेंटर पॉइंट स्कूल, अमरावती रोड बायपास द्वितीय, तर सेंटर पॉइंट स्कूल, काटोल रोड तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणित विभागप्रमुख अर्चना कुलकर्णी, अंजू अग्रवाल तसेच सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव नागेश कानगे, मुख्याध्यापक मंजुल मेहता, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा पाध्ये, पर्यवेक्षिका शिल्पा डोंगरे आणि कर्मचाऱ्यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होत बौद्धिक कौशल्यांना चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
 
Powered By Sangraha 9.0