संगीताच्या सुरांनी कवितांचा गजर

16 Dec 2025 14:45:14
नागपूर,
Nagpur News संगीतबद्ध कवितांचा अनोखा अनुभव देणारा कार्यक्रम ‘सूर भाळले शब्दांवरती’ रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. कन्सेप्ट्स अँड इव्हेंट्सच्या सुसज्ज दालनात आयोजित या कार्यक्रमात संपूर्ण नवीन कवितांना संगीतबद्ध करून सादरीकरण करण्यात आले. सुप्रसिद्ध संगीतकार मनिष उपाध्ये, अरविंद पाटील, प्रा. विजय जथे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले आणि शारदास्तवनने कार्यक्रमाची सुरुवात केली.
 
nagpur
 
कार्यक्रमात विविध धाटणीच्या कविता, त्यांच्या निर्मितीचे किस्से, कवींच्या श्रोत्यांशी गप्पा, आणि कर्णमधूर गाणी यांचा समन्वय पाहायला मिळाला. Nagpur News  गोविंद सालपे व विकास गजापूरे हे कवी, तसेच त्यांच्या कवितांना संगीतबद्ध करणारे संगीतकार संदीप गुरुमुळे, गायिका रंजना वराडे पाटील, प्रणाली गुरुमुळे, कु. रिद्धी गुरुमुळे, आणि तबलावादक निलेश खोडे यांनी कार्यक्रम सादर केला.
 
विकास गजापूरे यांच्या ‘सखे साजणे’, ‘इंद्रधनू’, ‘उत्तरायण’, ‘प्राजक्त’ या कवितांनी रंगत आणली, तर गोविंद सालपे यांच्या ‘काव्यउर्मी’, ‘ऋतूरंग’, ‘मनातला पाऊस’, ‘भन्नाट’, ‘किराण्याची यादी’ या कवितांनी श्रोत्यांना प्रभावित केले. संदीप गुरुमुळे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गीते ‘फुले टिपूर चांदणे’, ‘काळजात घाव झाले’, ‘तू हासलीस तेव्हा’, ‘आत्मानंद’, ‘मी बदललो वाटतो’, ‘राग रंगोत्सव’, ‘प्रेमात गुंतल्याचे’ यांनी कार्यक्रमाला श्रवणीयता दिली. Nagpur News गजापूरे यांची ‘झाडीबोली’ मधील कविता ‘दुस्परीनाम’ आणि सालपे यांची ‘किराण्याची यादी’ या हास्यकवितांनी कार्यक्रमात मनोरंजनाची मजा वाढवली. अखेर ‘आषाढ वारी’ या भैरवीने काव्यमैफिलीची सांगता झाली. ध्वनीसंयोजन गणेश सालपे यांनी केले, तर स्क्रॅच टू स्केल मिडीया ग्रुपच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
सौजन्य: विजय जथे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0