डॉ. अनिकेत आमटे यांच्या हस्ते रासेयो शिबिराचे उद्घाटन

16 Dec 2025 12:46:53
नागपूर,
Womens College विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित साप्ताहिक विशेष शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध समाजसेवक आदरणीय डॉ. अनिकेत आमटे यांच्या उपस्थितीत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. उद्घाटनानंतर मार्गदर्शनीय भाषणात डॉ. अनिकेत आमटे यांनी समाजसेवा, समानता, अंत्योदय घटक, भारतातील आजचा युवा आणि संवेदनशीलता यासारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

Womens College
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गुल्हाने यांनी अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधींच्या स्वच्छता आणि अहिंसा तसेच डिजिटल साक्षरतेच्या अनुषंगाने आजच्या युवा आणि शाश्वतता याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय सिंगनजुडे यांनी केले, तर प्रा. डॉ. दीपक पवार, प्रा. डॉ. दिपाली भावे, प्रा. डॉ. मंगेश शामकुरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. Womens College महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक व कर्मचारीवृंद देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहानी गोळे यांनी केले तर आभार लक्ष्मी पूडके यांनी मांडले. हे शिबिर "युथ फॉर माय भारत आणि डिजिटल साक्षरता" या संकल्पनेवर १४ डिसेंबर २०२५ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान अशोकवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
सौजन्य: अमित तीतरे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0