१९७१ च्या युद्धातील शहीद सैनिकांना एनसीसीचे अभिवादन

16 Dec 2025 19:08:14
देवळी, 
NCC : भारताला १९७१ च्या युद्धात चारही दिशांने धोका असतानाही भारतीय सैनिकांच्या अदम्य साहसामुळे आपण हे युद्ध जिंकले. या युद्धातील पराक्रमामुळे भारतीय सैन्याचे मनोबल, समर्पण, देशभती व अचूक नियोजन याचे जगापुढे उदाहरण निर्माण झाले. म्हणूनच भारतीय सैन्य दलाचे दुसरे नाव म्हणजे शौर्य व पराक्रम होय, असे प्रतिपादन १९७१ च्या विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एनसीसी छात्र सैनिकांनी आपल्या मनोगतातून व्यत केले.
 
 

k 
 
 
सुरुवातीला प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे यांनी सैनिक स्मारकास पुष्पचक्र वाहिले व एनसीसी छात्र सैनिकांना विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर व्यासपिठावर उपस्थित होते. एनसीसी छात्र सैनिकांनी अंडर ऑफिसर रितेश बुटे याच्या नेतृत्वात रायफलची राष्ट्रीय सलामी दिली व अभिवादन केले.
 
 
याप्रसंगी एनसीसी छात्र सैनिकांनी १९७१ च्या युद्धातील अभिमन्यू ही नाटिका सादर केली व त्यातून परमवीर चक्र विजेते लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखाव व महावीर चक्र विजेते मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या पराक्रम गाथा कंपनी सार्जंट मेजर कल्याणी लिखार, कॅडेट आरती मरघडे, राधिका नागोसे, पायल नखाते व सोमेश्वर पोराटे यांनी सादर केल्या.
 
 
एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी १९७१ च्या युद्धाची शौर्य कथा छात्र सैनिकांना सांगितली. संचालन अंडर ऑफिसर कोमल शितळे तर आभार कॅडेट सत्तेश्वरी सावरकर हिने मानले. यशस्वीतेकरिता अंडर ऑफिसर मयुरी पेटकर, सार्जंट निशांत शितळे, वैष्णवी कन्नाके, साक्षी परिसे, स्नेहा मडकाम, सलोनी अजमीरे व एनसीसी छात्रसैनिकांनी प्रयत्न केले.
Powered By Sangraha 9.0