मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंगवेळी खाजगी विमानाला आग, ७ ठार

16 Dec 2025 09:19:53
मेक्सिको सिटी,
Plane catches fire in Mexico मेक्सिकोमध्ये एक भीषण विमान अपघात घडला असून आपत्कालीन लँडिंग करताना खाजगी लहान विमान कोसळून किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सोमवारी सॅन माटेओ अटेन्को या औद्योगिक परिसरात घडली. हे ठिकाण टोलुका विमानतळापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असून मेक्सिको सिटीच्या पश्चिमेला जवळपास ५० किलोमीटरवर आहे. संबंधित विमानाने मेक्सिकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील अकापुल्को येथून उड्डाण केले होते.
 
 

Plane catches fire in Mexico  
मेक्सिकन राज्य नागरी संरक्षण समन्वयक एड्रियन हर्नांडेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात आठ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. मात्र अपघातानंतर काही तासांच्या शोधमोहीमेत केवळ सात मृतदेह सापडले आहेत. उर्वरित लोकांचा शोध आणि ओळख प्रक्रिया सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे विमानाने एका फुटबॉल मैदानावर उतरायचा प्रयत्न केला. मात्र उतरत असताना ते जवळच्या इमारतीच्या धातूच्या छताला धडकले. या धडकेनंतर विमानाला भीषण आग लागली आणि काही क्षणांतच आजूबाजूच्या परिसरात आग पसरली. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दल आणि बचाव पथके दाखल झाली व मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.
Powered By Sangraha 9.0