नायब तहसीलदाराकडून स्मशानभूमी गायब

16 Dec 2025 15:42:42
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
nageshwadi stormed नागेशवाडी येथील स्मशानभूमीची 20 गुंठे जमीन नायब तहसीलदार यांनी गावातील शेतकèयांच्या नावाने केल्याने आता गावांमधील मयताची अंत्यसंस्काराची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. नायब तहसीलदारांनी 18 जुलै रोजी पारित केलेला हा आदेश व फेरफार रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन नागेशवाडी येथील सरपंच व गावकèयांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना देण्यात आले आहे.
 


नागेशवाडी  
 
नागेशवाडी येथील 5 हे 22 शेत जमीन सुगंधा धनाजी व लिलावती तुकाराम बाभळे यांच्या मालकीची होती. 1 हेक्टर 16 आर पोटखराब जमीन उमरखेड महागाव रस्त्यासाठी अर्जित झाली आहे. तसेच 20 आर जमीन 1950-51 पूर्वीपासून नागेशवाडीच्या स्मशानभूमीसाठी त्यांच्या पूर्वजांनी दिली आहे. सुगंधाबाई व लिलावती यांनी 1995 मध्ये स्मशानभूमीची जमीन सोडून हे शेत गंगाधर टेकाळे यांना विकली. त्यानंतर बाभळे यांनी 1998 ला नोंदणी कृत खरेदीखत करून 20 आर जमीन विक्री केली. त्यानंतर शिल्लक जमिनीतून 2008 मध्ये 21 आर जमीन विक्री केली. त्यानंतरही उर्वरित जमिनीतून सुगंधाबाई व लिलावती यांनी 81 आर जमीन विक्री केली.
 
तेव्हा रस्त्याखालील 1 हेक्टर 16 आर आणि स्मशानभूमीची 20 आर जमीन अशी एकूण 1 हे 36 जमीन पोटखराब म्हणून गंगाधर टेकाळे यांचे शे सर्वे नं 2/2 ब च्या गावनमुना सातबारावर नोंद करण्यात आली होती. त्यानंतर धनाजी तुकाराम बाभळे यांनी कार्यकारी दंडाधिकारी उमरखेड यांच्याकडे प्रकरण दाखल केले.
 
जमिनीचे संपूर्ण अभिलेख न तपासता सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून 18 जुलै रोजी धनाजी तुकाराम व गजानन तुकाराम बाभळे यांच्या नावाने चुकीचा आदेश पारित केल्याचे गावकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे या आदेशाचा दुरुपयोग करून संबंधित व्यक्ती गावकऱ्यांना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव करीत आहे. त्यामुळे मृतात्म्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने गावातील मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार कुठे करावा, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कार्यकारी दंडाधिकारी तथा नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांनी पारित केलेला आदेश रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन नागेशवाडी येथील सरपंच प्रियंका जटाळे, ग्रामपंचायत सचिव एसएस भांडवले, उपसरपंच सीमा सुरोशे, नागेश गोरेवाड, परमेश्वर जटाळे, गजानन सुरोशे, संभाजी सुरोशेसह गावकèयांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
जमिनीचा पोटखराब हिस्सा हा मूळ शेतमालकाच्या हद्दीत येतो.nageshwadi stormed त्यामुळे तशा प्रकारे आदेश पारित करण्यात आला आहे. ही प्रक्रिया नियमांनुसार करण्यात आली आहे.
- विश्वंभर राणे
नायब तहसीलदार, उमरखेड

स्मशानभूमी जागेवर पुढील आदेशापर्यंत कोणताही अडथळा करण्यात येऊ नये
- सखाराम मुळे
उपविभागीय अधिकारी, उमरखेड
Powered By Sangraha 9.0