नागपूर,
rss research and public welfare committee रा.स्व. संघ संशोेधन व लोककल्याण समितीची वर्ष 2024-2025 ची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवाजीनगरातील लोककल्याण भवनात संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. सभेत विशेष अतिथी विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे, नागपूर महानगर प्रचारक अमित तुरणकर, सेवा विभाग प्रचारक अभिषेक मिश्रा, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, सेवाप्रमुख हरीनारायण येवले व सहसेवाप्रमुख संजय जोगळेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव माधव उराडे यांनी लोककल्याण समितीच्या वतीने चालणाèया विविध सेवा कार्याची व सेवा प्रकल्पाची सविस्तर माहिती सभेला दिली. संघाच्या शताब्दी वर्षात नागपुरातील सर्व 341 सेवा वस्तींमध्ये सेवा संपर्क करण्याचा मानस व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यांनी सेवा कार्याची गुणवत्ता वाढविण्याचे आवाहन केले.rss research and public welfare committee लोककल्याण समितीची पुढील तीन वर्षांसाठी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्ष- डॉ. दिलीप गुप्ता, उपाध्यक्ष- मिलींद पाठक, सचिव-माधव उराडे, सहसचिव धनंजय वैद्य, कोषाध्यक्ष- संजय हरदास, सदस्य- मनोहर सपकाळ, प्रणिता जांभोरकर, अरुणा आवळे, प्रसाद वरदडकर, निलेष जोशी, चैतन्य देशपांडे. निमंत्रित सदस्य- आशीष बडगे, विनय अंबुलकर, सुनील अडबे, हरीनारायण येवले. (वा)