धंतोलीत चौकाचे लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर नामकरण

16 Dec 2025 09:48:45
नागपूर,
mavshi kelkar महानगरपालिकेच्या सौजन्याने धंतोलीमधील घाट रोड चौकाचे नामकरण वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर चौक असे सोमवारी सकाळी करण्यात आले. महानगरपालिकेचे लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, राष्ट्र सेविका समितीच्या अ.भा. सहकार्यवाहिका चित्रा जोशी यांच्या हस्ते नामकरण झाले. याप्रसंगी रा.स्व.संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, कार्यवाह रवींद्र बोकारे, माजी नगरसेवक संजय बंगाले, समितीच्या अ.भा. कार्यालय प्रमुख पूनम गुप्ता, अहल्याबाई स्मारक समितीच्या अध्यक्ष करुणा साठे, सुधीर वऱ्हाडपांडे , प्रा. श्रीकांत पांडे, गणमान्य बंधू-भगिनी उपस्थित होते.
 

मावशी केळकर  
 
 
चित्रा जोशी यांनी चौकाचे नामकरण वंदनीय मावशी केळकर यांच्या नावाने करणे सुसंगत असल्याचे सांगितले. राष्ट्र सेविका समितीचे पहिले कार्यालय नाशिकला राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने सुरू झाले. त्यानंतर केंद्र कार्यालयाचा विषय आल्यावर वं. मावशींनी नागपूर येथे, धंतोलीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी व कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे करण्याचा विचार मांडला होता. मावशी केळकर यांचा बरेच वर्ष निवास हा धंतोलीमध्येच असल्यामुळे धंतोलीतीलच एका चौकाला मावशी केळकरांचे नाव द्यावे, अशी मनिषा होती.mavshi kelkar ती महानगर पालिकेने पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 2025-26 मध्ये राष्ट्र सेविका समितीच्या कार्याला 90 वर्षे होत आहेत. या वर्षात असा कार्यक्रम होणं हा सुंदर योगच म्हणावा लागेल, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक महानगर सह संपर्कप्रमुख अर्चिता पांडे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0